आजी – आजोबांसह नातीची गळा चिरुन हत्या

गडचिरोली येथील, भामरागड तालुक्यातील गुंडापुरीत, वृद्ध आजी – आजोबांसह नातीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अर्चना रमशे तलांडे (१०, रा. येरकल ता.एटापल्ली), देवू दसरु कुमोटी (६०), बिच्चे देवू कुमोटी (५५,रा. गुंडापुरी ता. भामरागड) अशी मृतांची नावे आहेत. देवू कुमोटी यांची विवाहित मुलगी मरकल (ता.एटापल्ली) येथे राहते. चौथीच्या वर्गात शिकणारी तिची कन्या अर्चना तलांडे ही दिवाळीच्या सुटीत आजी – आजोबांकडे आली होती.
अर्चना तलांडेसह देवू व बिच्चे कुमोटी या तिघांचा गळा चिरलेला मृतदेह घरात आढळून आला. माहिती मिळताच घटनास्थळी एटापल्लीच्या बुर्गी (कांदोळी) ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पटवण्यात आले आहे. हत्या नेमकी कोणी केली व संपत्तीचा वाद नेमका कोणासोबत होता, या बाबींच्या आधारे तपास सुरु आहे.
ही घटना वैयक्तिक संपत्तीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. योग्य तो तपास करुन आरोपींना जेरबंद केले जाईल. असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.
MarathaReservationUpdate : मराठा आरक्षण क्युरेटिव्ह याचिकेवरील सुनावणी पूर्ण
महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
For News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765