Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद जिल्ह्यात आता ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार , १४ लाख ५८ हजार महिला

Spread the love

औरंगाबाद : लोकसभा निवडणूक २०२४ साठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली. नामनिर्देशनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत (दि.२५) ही यादी अद्यावत केली जाते. त्यानुसार, ही यादी जाहीर करण्यात आली. आता अद्यावत यादीनुसार जिल्ह्यात ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार मतदानात भाग घेतील, अशी माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली.

जिल्ह्यातील मतदार यादीत १६ लाख ६ हजार ६१३ पुरुष, १४ लाख ५८ हजार ३८१ महिला तर १४० इतर तसेच २५७३ सर्व्हिस मतदार असे एकूण ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार समाविष्ट आहेत.

विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार संख्या याप्रमाणे-

१०४ सिल्लोड- पुरुष १ लाख ७९ हजार १७, महिला १ लाख ६० हजार८२६, इतर ४, सर्व्हिस मतदार ५७७
१०६ फुलंब्री- पुरुष १ लाख ८४ हजार ९८५, महिला १ लाख ६६ हजार ८१९, इतर ४, सर्व्हिस मतदार ३५३
११० पैठण- पुरुष १ लाख ६४ हजार ८०२, महिला १ लाख ४८ हजार ९६३, इतर ४, सर्व्हिस मतदार १३४
१०५ कन्नड- पुरष १ लाख ७१ हजार ६८, महिला १ लाख ५३ हजार ९९५, इतर ९, सर्व्हिस मतदार ५६५
१०७ औरंगाबाद (मध्य)- पुरुष १ लाख ८० हजार ३५६, महिला १ लाख ६९ हजार ७९०, इतर ५, सर्व्हिस मतदार १०१.
१०८ औरंगाबाद (पश्चिम)- पुरुष २ लाख ५ हजार ९०, महिला १ लाख ८४ हजार ६८, इतर ७७, सर्व्हिस मतदार १४१.
१०९ औरंगाबाद (पूर्व)- पुरुष १ लाख ७६ हजार ६८१, महिला १ लाख ६१ हजार ४१९, इतर १३, सर्व्हिस मतदार ५१.
१११ गंगापूर-पुरुष १ लाख ८२ हजार २६८, महिला १ लाख ६४ हजार ८३२, इतर २२, सर्व्हिस मतदार २८९.
पुरुष १ लाख ६२ हजार ३४६, महिला १ लाख ४७ हजार ६६९, इतर २, सर्व्हिस मतदार ३६३.

औरंगाबाद जिल्ह्याचा १८ जालना लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सिल्लोड, फुलंब्री, पैठण या तीन विधानसभा क्षेत्रातील एकत्रित मतदार संख्या याप्रमाणे- पुरुष५ लाख २८ हजार ८०४, महिला ४ लाख ७६ हजार ६०८, इतर १२ सर्व्हिस मतदार १०६३ असे एकूण १० लक्ष ६ हजार ४८७. तर १९- औरंगाबाद मतदार संघात समाविष्ट अन्य सहा विधानसभा क्षेत्रातील एकत्रित मतदार संख्या याप्रमाणे- पुरुष १० लाख ७७ हजार ८०९, महिला ९ लाख ८१ हजार ७७३ इतर १२८ सर्व्हिस मतदार १५१० असे एकूण २० लाख ६१ हजार २२० इतके मतदार आहेत.

मतदार चिठ्ठ्या वाटपास प्रारंभ

लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने येत्या दि.१३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारांना आपले मतदानाचे केंद्र , यादीतील क्रमांक इ. ची माहिती असलेली मतदार चिठ्ठी वाटपास आजपासून प्रारंभ झाला अशी माहिती सहा. नोडल अधिकारी अविनाश अंकूश यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार चिठ्ठ्यांचे वितरण होणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांना आपले मतदानाचे केंद्र, मतदार यादीतील क्रमांक इ. माहिती सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी मतदार चिठ्ठ्या (Voter Information Slip) दिल्या जातात. मतदारांपर्यंत ह्या चिठ्ठ्या त्या त्या भागात नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत वितरीत होणार आहेत. मतदारांनी आपापल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आपली मतदार चिठ्ठी प्राप्त करुन घ्यावी व सोमवार दि.१३ मे रोजी आपला मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!