Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिर , ३७० सर्वच कॅन्सल करेल , मोदींची काँग्रेवर टीका …

Spread the love

बीड : इंडीया आघाडीचा एकच अजेंडा आहे. हे सरकारमध्ये येऊन मिशन कॅन्सल राबवणार. इंडीवाले सरकारमध्ये येतील, तेव्हा ते हटवलेलं कलम ३७० पुन्हा आणतील. सीएए रद्द करणार, तीन तलाकविरोधातील कायदा रद्द करतील, हे लोक मोदी शेतकरी सन्मान योजेतील पैसे रद्द करतील, मोफत रेशन योजना रद्द करतील, आम्ही देशाच्या ५५ कोटी गरिबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देत आहोत, काँग्रेस ही योजनासुद्धा रद्द करेल”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

“मोदी विकसित भारताच्या मिशनवर निघाला आहे. या संकल्पासाठी आज मी आपल्याकडून काही मागायला आलो आहे. मला तुमच्याकडून आशीर्वाद पाहिजे आहेत. माझे वारसदार तुम्हीच आहात. तुमच्या येणाऱ्या पिढ्या माझे वारस आहेत. मी तुमच्या भविष्याला उत्तम बनवायला निघालो आहे. मी तुमच्या मुलांच्या भविष्याला उत्तम बनवण्याकरता दिवसरात्र मेहनत करत आहे. तुम्हीच माझं कुटुंब आहे. माझा भारत, माझं कुटुंब”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर मोदी सरकारच्या योजना कॅन्सल करतील, काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं सरकार राम मंदिरही कॅन्सल करेल, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी त्यांनी काँग्रेससह अनेक नेत्यांवर टीका केली. तसंच, सोनिया गांधींवर त्यांनी गंभीर आरोपही केला. काँग्रेससह इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

मोदींवा गोपीनाथ मुंडेंची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, गोपीनाथ मुंडेंसोबत मनाचे संबंध होते, ते नेहमी मराठवाड्याच्या विकासाची चर्चा करायचे. 2014 मध्ये मला तुम्ही साथ दिली, त्यावेळी गोपीनाथजी सारख्यांना निवडून दिल्लीला घेवून गेलो. पण दुर्दैवाने काही दिवसात मला माझ्या सहकारी ला गमवावे लागलं. सुषमा स्वराज, अरुण जेटली यांना गमावल्यानंतर माझे हात कट झाल्याची भावना निर्माण झाली. स्वाभाविक आहे मला आज गोपीनाथ जीची आठवण येत आहे, असं मोदींनी म्हटलं.

काँग्रेसचा राम मंदिराला विरोध

मी आज तुमच्याकडे काही मागायला आलोय. मला तुमचे आशीर्वाद पाहिजे आहेत. माझी संपत्ती तुम्ही आहात. तुम्हीच माझे कुटुंब आहात. माझा देश माझे कुटुंब. एका काँग्रेस नेत्याने ज्याने काही दिवसा पूर्वी काँग्रेस सोडली. त्यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. ज्यावेळी राम मंदिराचा निकाल आला, त्यावेळी शहजाद्याने म्हटलं होतं की, काँग्रेस सरकार आल्यावर राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलणार होते, असं वक्तव्य मोदींनी केलं आहे.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!