10 रुपयांची नाणी घेण्यास नकार दिल्यास राजद्रोहाचा गुन्हा , या नंबरवर करा फोन …
नवी दिल्ली : बाजारात अनेक दुकानदार आहेत जे ग्राहकांकडून 10 रुपयांची नाणी घेण्यास नकार देतात. पण तसे करणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे. जोपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय कोणत्याही नाण्यावर बंदी घालत नाही तोपर्यंत प्रत्येक दुकानदाराला ग्राहकाकडून नाणे घ्यावे लागेल. तसे न केल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
जर एखादा दुकानदार तुमच्याकडून 1 रुपया किंवा 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार देत असेल तर त्याला आधी कायद्याचे नियम समजावून सांगा. एखादा दुकानदार तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकता. तुम्ही RBI च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा त्याच्या टोल फ्री क्रमांक 144040 वर तक्रार करू शकता. नाणे न घेतल्यास दुकानदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण राष्ट्रीय चलनाचा अपमान होऊ शकत नाही. म्हणूनच भविष्यात तुमच्यासोबत असे काही घडले तर तुम्ही त्याबद्दल ताबडतोब तक्रार करावी.