Worlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत !!
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात “चौकिदार – चौकिदार ” खेळ खेळण्यात दंग असतानाच २०१४ चर्या निवडणुकीपासून “अच्छे दिन”चे स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांना एक चिंताजनक बातमी वाचायला मिळत आहे. ती बातमी ही आहे किंवा, संयुक्त राष्ट्राच्या Worlds Happiest Countries Report मध्ये भारताची 140 व्या स्थानावर घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची सात स्थानांनी घसरण झाली आहे.
जगभरातील 156 देशांच्या या यादीत नेहमीप्रमाणे फिनलँड सर्वात आनंदी देशांच्या यादीत यावर्षीही अव्वल क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानही भारताच्या पुढे आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास सोल्युशनकडून हा अहवाल जारी करण्यात आलाय. संयुक्त राष्ट्र महासभेने 2012 मध्ये 20 मार्च हा वर्ल्ड हॅप्पीनेस डे म्हणून घोषित केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्राची ही सूची सहा निकषांवर निश्चित केली जाते. यामध्ये वय, देशातील लोकांचं स्वास्थ्य, सामाजिक सहकार्य, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारता या गोष्टींचा समावेश असतो.
गेल्या काही वर्षांमध्ये सरासरी आनंदी आकडेवारीमध्ये घट झाली आहे. यात भारताचीही रँक घसरली आहे. 2018 मध्ये भारत या यादीत 133 व्या क्रमांकावर होता, तर यावेळी 140 वा क्रमांक आहे.
संयुक्त राष्ट्राचा हा सातवा अहवाल आहे. देशातील लोक स्वतःला त्यांच्या देशात किती सुखी समजतात यावर हा अहवाल तयार केला जातो. विशेष म्हणजे लोकांची चिंता, उदासपणा आणि रागासह नकारात्मक भावनांमध्ये वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलंय.
फिनलँडने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल राहण्याचा मान मिळवला. यानंतर डेनमार्क, नॉर्वे, आईसलँड आणि नेदरलँडचा क्रमांक लागतो. या रिपोर्टनुसार पाकिस्तान 67, बांगलादेश 125 आणि चीन 93 व्या स्थानावर आहे. म्हणजेच पाकिस्तान सुखी देशांच्या बाबतीत चीनच्याही पुढे आहे.
युद्धग्रस्त सुदानमधील लोक त्यांच्या जीवनाविषयी सर्वात जास्त दुःखी आहेत. यानंतर मध्य आफ्रिका (155), अफगाणिस्तान (154), तंजानिया (153) आणि रवांडा (152) यांचा क्रमांक लागतो. जगातील सर्वात श्रीमंत देश लक्झमबर्ग या यादीत 14 व्या क्रमांकावर आहे.
यादीतील पहिल्या 25 देशात फिनलँड , डेनमार्क, नॉर्वे, आईसलँड, नेदरलँड, स्वित्झर्लंड, स्वीडन, न्यूझीलड , कॅनडा, ऑस्ट्रिया , ऑस्ट्रेलया , कोस्टारिका, इस्रायल, लक्झमबर्ग, ब्रिटन , आयर्लंड, जर्मनी, बेल्जियम, अमेरिका, झेेक रिपब्लिक, संयुक्त अरब अमिराती, माल्टा, मेक्सिको , फ्रान्स, चीनचा तैवान प्रांत या देशांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे देशातील मुलभूत विकासाचे विषय न हाताळता , केवळ विरोधकांच्या टिंगलटवाळीवर कोट्यावधी रुपयांचा चुराडा करुन अतिशय धूर्तपणे लोकांना पुन्हा एकदा भावनिक बनवून हि निवडणूक सत्ताधारी पक्षाकडून लढवली जात आहे. पण याची न कुणाला खंत आहे ना खेद.
मोदी भक्तना अणि जातीयवादात गुरफटलेल्या लोकांना ही गोष्ट समजणार नही अणि समजाऊन घ्यायचिसद्धा नाही
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . असेच संपर्कात राहा .
देशातील मतदाराला गोलमाल केल्या जात आहे…..
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . असेच संपर्कात राहा .