Loksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला ? भूतान ते दक्षिण कोरिया
गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती विदेश दौरे झाले आणि खर्च किती झाला आणि या दौऱ्यातून काय साध्य झाले हा देशातील नागरिकांसाठी नेहमीच चर्चेचा विषय झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ फेब्रुवारी – २२ फेब्रुवारी, २०१९ पर्यंत एकूण ९३ दौरे केले असून यापैकी १२ दौऱ्यांची बिले सादर करण्यात आलेली नाहीत. यातील ६ बिलांचे हिशेब अप्राप्त आहेत तर ६ दौऱ्यात त्यांनी आयएएफ बीबीजे विमान वापरले आहेत ज्याच्या खर्चाचा तपशील उपलब्ध नाही. विशेष म्हणजे हा खर्च फक्त विमान प्रवासाचा आहे. इतर खर्चाचा तपशील उपलब्ध नाही. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार हा खर्च २००० हजार कोटीहून अधिक आहे.
त्यांचा पहिला दौरा १५, १६ जून २०१४ चा असून अखेरचा दौरा दक्षिण कोरिया- 21 फेब्रुवारी – 22 फेब्रुवारी, 2019 असा आहे.
राज्यसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार २०१४ ते २०१८ या वर्षातील १० प्रमुख विदेश दौऱ्यात एफडीआय अंतर्गत भारतात अनेक देशांनी गुंवणूकीचे करार केले आहेत. हि गुंतवणूक ३०,९३०.५ (२०१४) आणि ४३४७८.२७ मिलियन युएसडी (२०१७) अशी असल्याचे विदेश व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंघ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरातसांगितले, पण पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या खर्चाचा पूर्ण तपशील त्यांनी दिला नाही.
पंतप्रधानाचे विदेश दौरे आणि विमान प्रवास खर्चाचा तपशील : आकडे कोटीमध्ये आहेत.
भूतान, 15 जून – 16 जून, 2014 2,45,27,465
ब्राझिल, 13 जुलै – 17 जुलै 2014- 20,35,48,000
नेपाळ- 3 ऑगस्ट – 5 ऑगस्ट 2014- आयएएफ बीबीजे विमान
जपान- 30 ऑगस्ट – 3 सप्टेंबर 2014- 13,47,58,000
अमेरिका- 25 सप्टेंबर – 1 ऑक्टोबर 2014- 19,04,60,000
म्यानमार, ऑस्ट्रेलिया आणि फिजी- 11 नोव्हेंबर – 20 नोव्हेंबर 2014 -22,58,65,000
नेपाळ- 25 नोव्हेंबर – 20 नोव्हेंबर 2014 -आयएएफ बीबीजे विमान
सेशल्स, मॉरिशिअस आणि श्रीलंका- 10 मार्च ते 14 मार्च 2015- 15,85,25,000
सिंगापूर- 28 मार्च – 29 मार्च 2015- आयएएफ बीबीजे विमान
फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा- 9 एप्रिल – 17 एप्रिल 2015- 31,25,78,000
चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया- 14 एप्रिल – 19 एप्रिल 2015- 15,15,43,000
बांगलादेश- 6 जून – 7 जून 2015- आयएएफ बीबीजे विमान
उझबेकिस्तान, कझाकिस्तान, रशिया तुर्कस्तान, किर्गिझस्तान आणि तझाकिस्तान- 6 जुलै– 14 जुलै 2015- 15,78,39,000
संयुक्त अरब अमिराती- 16 ऑगस्ट – 17 ऑगस्ट 2015- 5,90,66,000
आयर्लंड आणि अमेरिका- 23 सप्टेंबर – 29 सप्टेंबर 2015- 18,46,95,000
ब्रिटन आणि तुर्की- 12 नोव्हेंबर – 16 नोव्हेंबर 2015- 9,30,93,000
मलेशिया आणि सिंगापूर- 20 नोव्हेंबर – 24 नोव्हेंबर 2014- 7,04,93,000
फ्रान्स- 29 नोव्हेंबर – 30 नोव्हेंबर 2015- 6,82,81,000
रशिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान- 23 डिसेंबर – 25 डिसेंबर 2015- 8,14,11,000
बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबिया- 30 मार्च – 03 एप्रिल 2016- 15,85,02,000
इराण- 22 मे – 23 मे 2016- आयएएफ बीबीजे विमान
अफगाणिस्तान, कतार, स्विर्झलंड, अमेरिका आणि मेक्सिको- 4 जून – 9 जून 2016- 13,91,66,000
उझबेकिस्तान- 23 जून – 24 जून 2016-6,32,78,000
मोझंबिक, दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि केनिया- 7 जुलै – 11 जुलै 2016- 12,80,94,000
व्हिएतनाम आणि चीन- 2 सप्टेंबर – 5 सप्टेंबर 2016-9,53,91,000
लाओस- 7 सप्टेंबर – 8 सप्टेंबर 2016- 4,77,51,000
जपान- 10 नोव्हेंबर-12 नोव्हेंबर, 2016-13,05,86,000
श्रीलंका- 11 मे -12 मे , 2017- 5,24,04,000
जर्मनी, स्पेन, रशिया & फ्रान्स- 29 मे -3 जून, 2017- 16,51,95,000
कझाकस्तान- 8 जून-9 जून, 2017- 5,65,08,000
पोर्तुगल, अमेरिका आणि नेदरलँड्स- 24 जून-27 जून, 2017- 13,82,81,000
इस्रायल आणि जर्मनी- 4 जुलै-8 जुलै, 2017-11,28,48,000
चीन आणि म्यानमार- 3 सप्टेंबर-7 सप्टेंबर, 2017- 13,87,80,000
फिलिपिन्स- 12 नोव्हेंबर-14 नोव्हेंबर2017- 10,11,68,000
स्वित्झर्लंड- 22 जानेवारी-23 जानेवारी,2018- 13,20,83,000
जॉर्डन, पॅलेस्टीन, युएई आणि ओमान- 09 फेब्रुवारी-12 फेब्रुवारी,2018- 9,59,64,000
स्वीडन, यु.के. आणि जर्मनी- 16 एप्रिल-20 एप्रिल,2018- 10,62,57,000
चीन- 26 एप्रिल-28 एप्रिल,2018- 6,07,46,000
नेपाळ- 11 मे-12 मे,2018- बिल मिळाले नाही
रशिया- 21 मे-22 मे,2018- 7,26,38,000
इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर- 29 मे-2 जून,2018- 10,21,84,000
चीन- 09 जून-10 जून,2018-7,83,56,000
रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिका- 23 जुलै-28 जुलै,2018-14,11,76,000
नेपाळ- 30 ऑगस्ट – 31 ऑगस्ट , 2018- आयएएफ बीबीजे विमान
जपान- 27ऑक्टोबर-30 ऑक्टोबर,2018-बिल मिळाले नाही
सिंगापूर- 13 नोव्हेंबर-15 नोव्हेंबर,2018- बिल मिळाले नाही
मालदीव- 17 नोव्हेंबर -17 नोव्हेंबर, 2018- बिल मिळाले नाही
अर्जेंटिना- 28 नोव्हेंबर – 3 डिसेंबर, 2018-बिल मिळाले नाही
२०२१ कोटी २०१८ संपे पर्यंत झाला होता
Thanks for comment. Keep in touch.
Awak karnare akade ahet
Thanks For Comment . Keep in Touch.