Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MVANewsUpdate : काँग्रेसच्या बैठकीनंतर रमेश चेन्निथला यांनी दिली कॉँग्रेसच्या अंतिम यादीबद्दल अधिकृत माहिती….

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई  : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीतील कॉँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांच्यातील जागा वाटपचा तिढा अद्याप सुटलेला नाही . खासकरून विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून हा संघर्ष चालू आहे.  यावरून काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पुन्हा मध्यस्थी करत चर्चा सुरू केली. यावरून आज दिल्लीत काँग्रेस निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर चेन्निथला यांनी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय कधी होईल, याची माहिती दिली.

Advertisements

काँग्रेस निवडणूक समितीच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

काँग्रेसच्या बैठकीनंतर रमेश चेन्निथला काय म्हणाले?

“उद्या (२२ ऑक्टोबर) तीन वाजता मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होईल. २५ तारखेपर्यंत सर्व जागांचा अंतिम निर्णय घेतला जाईल आणि २५ तारखेला जागावाटपाची घोषणा केली जाईल”, अशी महत्त्वाची माहिती रमेश चेन्निथला यांनी दिली.

बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल रमेश चेन्निथला म्हणाले, “आज झालेल्या निवडणूक समितीच्या बैठकीत ६३ जागांबद्दल चर्चा केली. अंतिम यादी तुम्हाला (माध्यमांना) दिली जाईल. उद्या (२२ ऑक्टोबर) मुंबईत आमच्या मित्रपक्षांसोबत चर्चा करून अंतिम यादी जाहीर केली जाईल”, असे चेन्निथला यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाविकास आघाडीत ७-८ जागांवरून तिढा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षात काही जागांवरून तिढा आहे. अनेक मतदारसंघांवर तिन्हीपैकी दोन पक्षांनी दावे केले. त्यातील अनेक मतदारसंघातील तिढा सुटला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ७-८ जागांवरच तिढा आहे.

या जागांसंदर्भात मंगळवारी (२२ ऑक्टोबर) महाविकास आघाडीच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याचा अंदाज आहे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत असून, त्यामुळे तिन्ही पक्ष अंतिम निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!