Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMediaNewsUpdate : एक रिल बनवा आणि सरकारकडून जिंका १५ हजार !!

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया प्रोग्रॅमला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. यासाठी सरकारने ‘अ डिकेड ऑफ डिजिटल इंडिया-रील कॉन्टेस्ट’ नावाची एक अनोखी स्पर्धा सुरू केली आहे. ही स्पर्धा १ जुलै २०२५ पासून सुरू झाली आहे आणि १ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार आहे.

ज्यांच्या आयुष्यात डिजिटल इंडियामुळे मोठा बदल झाला आहे त्यांच्यासाठी ही स्पर्धा आहे. जर ऑनलाइन सेवा, डिजिटल शिक्षण, आरोग्य सेवा किंवा आर्थिक साधनांमुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असेल, तर आता ते एका सर्जनशील रीलमध्ये बदलण्याची संधी आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना सरकार रोख बक्षिसे देत आहे. पहिल्या १० विजेत्यांना १५,००० रुपये, उर्वरित २५ सहभागींना १०,००० रुपये आणि निवडलेल्या पुढील ५० लोकांना ५,००० रुपयांचे बक्षीस मिळेल.

Advertisements

रिलमध्ये काय असेल ?

स्पर्धेच्या नियमानुसार ही रील किमान १ मिनिटाची असावी. व्हिडीओ मूळ असावा आणि कधीही पोस्ट न केलेला असावा. तुम्ही तो हिंदी, इंग्रजी किंवा कोणत्याही भारतीय भाषेत बनवू शकता. रील पोर्ट्रेट मोडमध्ये आणि MP4 स्वरूपात असावी. तुमचा व्हिडीओ डिजिटल इंडियाने तुमचे जीवन कसे बदलले आहे यावर आधारित असावा, या गोष्टी रील बनवताना लक्षात ठेवाव्यात.
रील कुठे अन् कशी पाठवायची

Advertisements
Advertisements

तुम्हाला या स्पर्धेशी संबंधित सर्व माहिती आणि रील अपलोड करण्याची लिंक सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://www.mygov.in/task/decade-digital-india-reel-contest वर मिळेल.

२०१५ मध्ये सुरू झालेल्या डिजिटल इंडिया प्रोग्रॅमने आज खेड्यांपासून शहरांपर्यंतच्या लोकांना तंत्रज्ञानाने जोडले आहे. ऑनलाइन सरकारी सेवा आणि डिजिटलायझेशनमुळे पारदर्शकता वाढली आहे. डिजिटल आरोग्य नोंदी, आधार लिंक सेवा, यूपीआय व्यवहार यासारख्या गोष्टी त्याचे यश दर्शवितात. आता सरकारला जनतेने त्यांच्या यशस्वी गोष्टींनी हे यश साजरे करायचे आहे. जर तुमच्याकडेही डिजिटल इंडियाची प्रेरणादायी कथा असेल तर तुम्ही ती रील बनवून पाठवू शकता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!