Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

टीम इंडिया हॉकीच्या जर्सीचा रंग भगवा; दोन माजी कर्णधारांचा आक्षेप, हॉकी इंडियाचे स्पष्टीकरण

Advertisements
Advertisements
Spread the love

2026 हॉकी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हॉकी इंडियाने भारतीय पुरुष आणि महिला संघासाठी नवीन जर्सी सादर केली असून, पारंपरिक निळ्या रंगाऐवजी भगव्या रंगाचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयावरून क्रीडाविश्वात चर्चा सुरू झाली असून, भारतीय हॉकी संघाचे दोन माजी कर्णधार विरेन रासकिन्हा आणि परगट सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर हॉकी इंडियाने हा बदल पूर्णपणे तांत्रिक आणि खेळाडूंच्या सूचनांनुसार करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisements

हॉकी इंडियाने 27 जुलै रोजी पुरुष आणि महिला संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण केले. यानंतर माजी कर्णधार विरेन रासकिन्हा यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, “भारतीय हॉकीची निळी जर्सी ही आमची ओळख होती. ती बदलणे दुर्दैवी आहे,” असे म्हटले. माजी कर्णधार परगट सिंग यांनीही जर्सीच्या रंगबदलावर आक्षेप घेत पारंपरिक ओळख कायम ठेवण्याची भूमिका मांडली.

Advertisements
Advertisements

हॉकी इंडियाचे स्पष्टीकरण

हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी सांगितले की, हा निर्णय खेळाडू, प्रशिक्षक, कर्णधार आणि सपोर्ट स्टाफ यांच्या सूचनांनुसार घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामने प्रामुख्याने निळ्या सिंथेटिक टर्फवर खेळले जातात. अशा परिस्थितीत निळ्या जर्सीमुळे वेगवान खेळादरम्यान खेळाडूंना सहकाऱ्यांची ओळख करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अधिक स्पष्ट दृश्यता मिळावी यासाठी भगव्या रंगाची निवड करण्यात आली.

तसेच, विश्वचषकानंतर खेळाडूंच्या अभिप्रायानुसार आवश्यक असल्यास भविष्यात जर्सीमध्ये पुन्हा बदल करण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नवीन पटनाईक यांचाही विरोध

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही या निर्णयावर टीका केली. त्यांनी म्हटले की, भारतीय हॉकी संघाची निळी जर्सी ही केवळ रंग नसून देशाच्या क्रीडा वारशाचे प्रतीक आहे. तिच्यातील भावनिक मूल्य दुर्लक्षित करता कामा नये.

प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही जर्सीच्या रंगबदलावर प्रतिक्रिया देत म्हटले की, देशाची खरी ओळख अहिंसा, सत्य आणि बंधुत्व यांसारख्या मूल्यांमध्ये आहे. ती कोणत्याही रंगबदलाने बदलू शकत नाही.

भारतीय संघाची जर्सी निळी का होती?

हॉकी इतिहासकार के. अरुमुगम यांच्या मते, भारतीय हॉकी संघ 1928 पासून प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या जर्सीत खेळत आला आहे. काळानुसार डिझाइनमध्ये बदल झाले, मात्र निळा रंग कायम राहिला.

1992 नंतर रंगीत जर्सीचा वापर वाढल्यानंतर अशोकचक्रातील निळ्या रंगावर आधारित ओळख अधिक मजबूत झाली आणि भारतीय संघाला ‘Men in Blue’ म्हणूनही ओळख मिळाली.

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, अनेक जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!