Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PM मोदींच्या कथित AI मॉर्फ्ड व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई; 6 Instagram अकाउंट्स आणि Meta India प्रमुखांविरोधात FIR

Advertisements
Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कथित AI-निर्मित (AI-generated) मॉर्फ्ड व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी हैदराबाद सायबर क्राइम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सहा इन्स्टाग्राम अकाउंट्स आणि Meta India चे प्रमुख अरुण श्रीनिवास यांच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यातील विविध कलमांअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Advertisements

प्राथमिक माहितीनुसार, NEET पेपर लीक आंदोलन आणि CJP (कॉकरोच जनता पार्टी) आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे कथित मॉर्फ्ड आणि आक्षेपार्ह AI व्हिडिओ व रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे.

Advertisements
Advertisements

हैदराबाद सायबर पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणाचा तपास आता हैदराबाद सायबर क्राइम पोलिसांकडून केला जाणार आहे. तपासादरम्यान AI-आधारित व्हिडिओंची निर्मिती कुठून झाली, ते सोशल मीडियावर कशा प्रकारे प्रसारित झाले आणि त्यांचा प्रसार रोखण्यासाठी उपलब्ध यंत्रणा प्रभावी होती का, याचा शोध घेतला जाणार आहे.

तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी यापूर्वी Meta च्या प्रतिनिधींना समन्स बजावत, AI-निर्मित व्हिडिओ, डीपफेक आणि फेक जाहिराती ओळखण्यासाठी कंपनीकडे कोणती तांत्रिक व्यवस्था आहे, याबाबत स्पष्टीकरण मागितले होते.

Meta India प्रमुख सह-आरोपी

या प्रकरणात प्रथमच Meta India चे प्रमुख अरुण श्रीनिवास यांना सह-आरोपी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असून अंतिम निष्कर्ष अद्याप काढण्यात आलेला नाही.

भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील भाजप सोशल मीडिया कोअर कमिटीचे सदस्य टी. साईकिरण गौड आणि एस. अरविंद रेड्डी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

तक्रारीत असा दावा करण्यात आला होता की, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांचे कथित AI मॉर्फ्ड व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. अशा प्रकारच्या सामग्रीमुळे नागरिकांची दिशाभूल होण्याबरोबरच देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेवरही परिणाम होऊ शकतो, असे तक्रारदारांनी म्हटले आहे.

हे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत फेसबुक व्हिडिओला तात्पुरते ब्लॉक करण्यात आले होते. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने Meta ला स्पष्टीकरणासाठी पाचारण केले होते. पुढे कंपनीने संबंधित तांत्रिक त्रुटी दुरुस्त करून अधिकृत व्हिडिओ पुन्हा उपलब्ध करून दिला होता.

आता मात्र AI-निर्मित कथित मॉर्फ्ड व्हिडिओंच्या प्रसाराबाबत स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.

पेपरफुटी विधेयकावर राहुल गांधींचं ५० मिनिटांचं आक्रमक भाषण; ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ शब्दांवरून लोकसभेत प्रचंड गदारोळ

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!