Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : प्रियंका गांधी यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार ठरला ….

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : वायनाड लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपा कोणाला मैदानात उतरवणार याबद्दल उत्सुकता होती. अखेर भाजपाकडूनवायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला असून, नव्या हरिदास यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड अशा दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही मतदारसंघात ते विजयी झाले होते. त्यानंतर वायनाड लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली.

वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे प्रियंका गांधी यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीची चर्चा राहुल गांधींनी या मतदारसंघाचा राजीनामा दिल्यापासून सुरू होती. काँग्रेसने गांधी कुटुंबातीलच व्यक्तीलाच वायनाडमधून उमेदवारी दिल्याने भाजपा कोणाला उमेदवारी देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. भाजपाने नव्या हरिदास यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नव्या हरिदास विरुद्ध प्रियंका गांधी अशी लढत होणार, हे स्पष्ट झालं आहे.

Advertisements

नव्या हरिदास कोण आहेत?

भाजपाने प्रियंका गांधी यांच्याविरोधात मैदानात उतरवलेल्या नव्या हरिदास कोण आहेत, अशीही चर्चा होत आहे. नव्या हरिदास या मॅकेनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी केरळमधील कालिकत विद्यापीठाशी सलग्नित केएमसीटी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून बी.टेकचे शिक्षण घेतले आहे.

Advertisements
Advertisements

एडीआरच्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे  १ कोटी २९ लाख ५६ हजार २६४ रुपयांची मालमत्ता आहे. त्या कोझिकोडे महापालिकेत नगरसेवक होत्या. सध्या त्या भाजपाच्या केरळ महिला मोर्चाच्या महासचिव आहेत. भाजपाने त्यांना कोझिकोड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

२०२१ कोझिकोड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत नव्या हरिदास तिसऱ्या स्थानी राहिल्या होत्या. काँग्रेसचे अहमद देवरकोविल यांनी इंडियन यूनियन मुस्लीम लीगच्या उमेदवार नूरबीना राशिद यांचा १२ हजार ४५९ मतांनी पराभव केला होता. तर नव्या हरिदास यांना २४ हजार ८७३ मते मिळाली होती.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!