WorldNewsUpdate : आंबेडकर इंटरनॅशनल मिशनद्वारे न्यूजर्सी येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस प्रचंड उत्साहात साजरा !!

न्यूयॉर्क : ओल्डब्रिज, न्यूजर्सी येथे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (एआयएम) च्या वतीने मोठ्या उत्साहात ६८ वा धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला न्यूयॉर्क, न्यूजर्सी आणि पेनसिल्व्हेनिया तसेच भारतातील जेष्ठ प्रवासी नागरिक उपस्थितहोते. या कार्यक्रमात आध्यात्मिक चिंतन, बौद्धिक चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक़्ते रेव्ह. टी.के. नागाकगी, (न्यूयॉर्क बौद्ध परिषदेचे मानद अध्यक्ष) ,यांनी यावेळी बोलताना ‘ शांती आणि सामंजस्य’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. बौद्ध तत्त्वज्ञानातील करुणा, संघभावना आणि अहिंसा या मुल्यांवर आधारित शांतीपूर्ण समाज निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच आजच्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी या शाश्वत मूल्यांचे महत्त्व त्यांच्या प्रभावी भाषण शैलीने पुन्हा एकदा स्पष्ट केले.
एआयएमचे वरिष्ठ सदस्य आयु. मिलिंद आवसरमोल यांनी नुकत्याच आलेल्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या “शेड्यूल्ड कास्ट कोट्यांचे उपविभाजन तसेच क्रीमीलेयर” संबंधित निर्णयावर सखोल चर्चा केली. सदर भाषणात या न्यायालयीन निर्णयाचे दूरगामी कायदेशीर परिणाम तसेच दलित समाजासाठी असलेल्या घटनात्मक आरक्षण व सामाजिक न्यायाच्या दिशा याचेही अत्यंत प्रभावी विश्लेषण करण्यात आले.
कार्यक्रमातील दुपारच्या सत्रात ‘भारतीय राज्यघटनेच्या समग्रतेस आव्हाने, बहुजन राजकारणाचा उगम आणि विकास, महिला नेतृत्व आणि सामाजिक न्यायापुढील आव्हाने’ या विषयावर एक अत्यंत विचारप्रवण चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले. एआयएमच्या सदस्यांनी या चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला आणि भारताच्या सामाजिक-राजकीय परिप्रेक्ष्यात या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली.
यावेळी भावपूर्णगायन, बहारदार नृत्ये यांच्या सदरीकरणाने कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत झाली. सर्व वयोगटातील स्त्री, पुरुषयांनी यात सहभाग घेतला. तसेच बालवयीन मुलांच्या प्रेरणादायक भाषणांचा आनंद उपस्थितांनी घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमांनी बौद्धसमुदायातील विविधतेचा आणि एकतेचा उत्सव साजरा करीत , सांघिक एकात्मतेला प्रोत्साहितकेले .
आंतरराष्ट्रीय पटलावर यशस्वीरित्या पार पडलेल्या या कार्यक्रमाने बौद्ध शिकवण, सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर आणिडॉ. आंबेडकर यांच्याआदर्शांवर विचार मांडण्याची एकमहत्त्वपूर्ण मंच प्रदान केला तसेच याद्वारे सर्व समविचारी बांधवाना एकत्र येण्याची , शिकण्याची आणि एकसंघ होण्याची उत्तम संधी प्राप्त झाली