Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VBA News Update : वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर….

Spread the love

मुंबई : वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत 30 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी वंचितकडून 21 उमेदवारांची घोषणा केली असून वंचितकडून आत्तापर्यंत 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून लवकरच जागावाटप घोषित होऊ शकते. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही आत्तापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यामध्ये, वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यात आलंय. रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. शमिभा या तृतीयपंथीय असून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर 10 मुस्लीम उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे एकूण 51 उमेदवार निश्चित झाले आहेत.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असली तरी अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही. अद्याप जागावाटपाची चर्चा सुरु आहे.

वंचितने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी..

1. शहेजाद खान सलीम खान मलकापुर विधानसभा

2. खतीब सैय्यद नातीकोद्दीन बाळापूर विधानसभा

3. सय्यद समी सय्यद साहेबजान परभणी विधानसभा

4. जावेद मो. इसाक औरंगाबाद मध्य विधानसभा

5. सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर गंगापूर विधानसभा

6. अयाज गुलजार मोलवी कल्याण पश्चिम विधानसभा

7. मोहम्मद अफरोज मुल्ला हडपसर विधानसभा

8. इम्तियाज जाफर नदाफ माण विधानसभा

9. आरिफ मोहम्मद अली पटेल शिरोळ विधानसभा

10. आल्लाउद्दीन हयातचाँद काजी सांगली विधानसभा

यापूर्वी जाहीर झालेले 11 उमेदवार

1. रावेर – शमिभा पाटील

2. सिंधखेड राजा – सविता मुंडे

3. वाशीम – मेघा डोंगरे

4. धामणगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा

5. नागपूर साऊथ वेस्ट – विनय भांगे

6. डॉ. आविनाश नन्हे – साकोली

7. फारुख अहमद – दक्षिण नांदेड

8. शिवा नरांगळे -लोहा

9. विकास रावसाहेब दांडगे- औरंगाबाद (संभाजीनगर)

10. किसन चव्हाण – शेवगाव

11. संग्राम माने – खानापूर

अशा प्रकारे आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडीने एकूण 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!