Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जळगाव शालार्थ घोटाळा उघड: ६०० बनावट शिक्षक आयडी, कोट्यवधींचा पगार लाटला; ४८ अधिकाऱ्यांना SIT नोटीस

Advertisements
Advertisements
Spread the love

जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागाला हादरवून टाकणारा शालार्थ घोटाळा उघडकीस आला असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांचे खोटे आयडी तयार करून कोट्यवधी रुपयांचा पगार लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात नाशिक विशेष तपास पथकाकडून (SIT) तब्बल ४८ शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Advertisements

४८ अधिकारी SITच्या रडारवर

Advertisements
Advertisements

या प्रकरणात माध्यमिक शिक्षण विभागातील आजी-माजी शिक्षणाधिकारी, ११ उपशिक्षणाधिकारी, ३ कक्षाधिकारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ सहाय्यकांचा समावेश आहे. सर्व संबंधितांना १५ ते १८ एप्रिलदरम्यान नाशिक विभागीय मंडळात सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बनावट भरतीचा मोठा गैरप्रकार उघड

तपासात असे स्पष्ट झाले आहे की, जळगाव जिल्ह्यातील काही शाळांनी कोणतीही पडताळणी न करता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ प्रणालीत खोटे आयडी तयार करून शासनाच्या निधीतून पगार काढण्यात आला.

२०२५ मध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगावमध्ये येऊन दहा शाळांच्या मुख्याध्यापक व संस्थाचालकांची चौकशी केली होती. या वेळी महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती. त्यानंतर SITने सखोल तपास सुरू ठेवत मोठ्या प्रमाणावर अनियमितता उघड केल्या.

तपासादरम्यान काही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तीन दिवस सुनावणीसाठी बोलावण्यात आले असून, त्यांच्या जबाबावरून पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

अमरावतीत १९ वर्षीय युवकाकडून १८० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; ३५० हून अधिक अश्लील व्हिडिओ प्रकरण उघड

आपलं सरकार

Click to listen highlighted text!