Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अमरावतीत १९ वर्षीय युवकाकडून १८० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; ३५० हून अधिक अश्लील व्हिडिओ प्रकरण उघड

Spread the love

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण उघडकीस आले आहे. अवघ्या १९ वर्षीय युवकाने तब्बल १८० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असून, त्याने ३५० पेक्षा अधिक अश्लील व्हिडिओ तयार केल्याचे समोर आले आहे. आरोपी मोहम्मद अयान अहमद उर्फ तनवीर अहमद याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लव्ह ट्रॅपद्वारे जाळ्यात अडकवून अत्याचार

पोलीस तपासात उघड झाले आहे की आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींशी ओळख वाढवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्यांना मुंबई आणि पुणे येथे नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याचे व्हिडिओ चित्रीत केले.

अत्याचारानंतर ब्लॅकमेलिंग आणि वेश्याव्यवसायात ढकलण्याचा आरोप

पोलिसांनी जप्त केलेल्या सुमारे १८० व्हिडिओंमध्ये आरोपी मुलींवर जबरदस्ती करताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंचा वापर करून आरोपी मुलींना ब्लॅकमेल करत होता आणि काहींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा गंभीर आरोप आहे. काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

आरोपीसोबत इतर साथीदारांचा संशय

या प्रकरणात आरोपी एकटाच नसून त्याला इतर काही जणांची मदत मिळाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही व्हिडिओंमध्ये दुसऱ्या व्यक्तीने चित्रीकरण केल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळ या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.

राजकीय स्तरावरही खळबळ

या गंभीर प्रकरणानंतर राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे आणि भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, या प्रकरणाचे अनेक पैलू असून सखोल चौकशी केली जाईल.

आरोपीच्या मोबाईलची तपासणी सुरू असून सायबर सेलद्वारे सोशल मीडियावरून अश्लील व्हिडिओ हटवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभेला बॉम्बस्फोटाची धमकी; पंतप्रधानांसह अनेक नेते लक्ष्यावर, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!