BJPNewsUpdate : योगी आदित्यनाथ म्हणाले काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिर विसर्जित करतील, राम भक्त म्हणजेच देश भक्त तर राम द्रोही म्हणजे देश द्रोही …
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई, महाराष्ट्र येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आणि उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना योगी म्हणाले की , भगिनींनो आणि बांधवांनो, मी तुम्हाला आवाहन करायला आलो आहे की, रामभक्त आणि राम देशद्रोही यांच्यातील फरक समजून घ्या . या निवडणुकीत जो राम भक्त आहे तोच देशभक्त आहे.
योगी पुढे म्हणाले की , “पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली जिथे आम्हाला राम मंदिर बांधायचे होते, ते आम्ही बांधले. मी काँग्रेसवाल्यांना सांगतो की, तुम्हाला इटलीमध्ये राम मंदिर बांधण्याची अजूनही संधी आहे आणि तुम्हाला रामाची चीड असेल तर बजरंगबलीचे मंदिर बांधा. या काँग्रेस नेत्यांना देव सुबुद्धी देणार नाही, सत्तेत आल्यावर राम मंदिर विसर्जित करू, असे त्यांचे नेते सांगतात. अहो रामलल्ला तुम्हाला सत्तेत येऊच देणार नाही . कारण तुम्ही रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहात . तुम्ही भारताच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहात, त्यामुळे तुम्हाला सत्ता स्थापनेची संधी मिळणार नाही.
मतदारांना आवाहन करताना ते पुढे म्हणाले की, भगिनींनो आणि भावांनो, मी तुम्हाला आवाहन करायला आलो आहे की, रामभक्त आणि राम देशद्रोही यांच्यातील या निवडणुकीत जो राम भक्त आहे , तोच देश भक्त आहे आणि तोच राष्ट्र विकास आणि राष्ट्राची सुरक्षाही करेल. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, हेच तुमच्या विकासाची वकिली करतील आणि मोदींच्या गॅरेंटीची १०० टक्के अंमलबाजवणी करतील, ही आमची गॅरेंटी आहे.
दरम्यान पालघर लोकसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत सीएम योगी म्हणाले, पीएम मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, येत्या ६ महिन्यांत ‘पाकव्याप्त काश्मीर’ही भारताचा भाग होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात स्थापन केलेले ‘हिंदवी स्वराज्य’. आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कायम राहणार आहे. कोणत्याही माईचा लाल त्यांना रोखू शकणार नाही.