आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता आली नवी तारीख , घरबसल्या असे करता येईल अपडेट
मुंबई : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी यूआयडीएआयने लोकांना नवी तारीख जाहीर केली आहे. आता कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आधारकार्डमधील माहिती अपडेट करता येणार आहे. ज्या लोकांच्या आधारकार्डला दहापेक्षा अधिक वर्षे झालेले आहेत, त्यांनी ते अपडेट करू न घ्यावे, असे UIDAI ने नागरिकांना सांगितले होते. याआधी मोफत आधार अपडेट करण्यासाठीची मुदत 14 मार्च ठेवण्यात आली होती. मात्र नंतर ही मुदत 14 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली.
दरम्यान यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही स्वत: 14 जूनपर्यंत तुमचे आधारकार्ड अपडेट करत असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क लागणार नाही. आधार केंद्रावर जाऊन तुम्ही तुमची माहिती अपडेट करण्याचं ठरवल्यास मात्र तुम्हाला शुल्क द्यावे लागू शकते. आधारकार्डवरील माहिती वेळेत अपडेट न केल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
सामान्यत: आधारकार्डवरील माहिती अपडेट करायची असल्यास तुम्हाला 50 रुपयांपर्यंतचे शुल्क द्यावे लागायचे. मात्र आता तुम्ही हीच माहिती 14 जूनपर्यंत विनाशुल्क अपडेट करता येऊ शकते.
आधारकार्ड कसे अपडेट करावे?
आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सर्वांत अगोदर तुम्हाला UIDAI च्या https://uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
त्यानंतर अधिकृत वेब पेजवर गेल्यानंतर My Aadhaar Portal वर क्लीक करावे.
त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून लॉगीन करावे.
त्यानंतर देण्यात आलेली सर्व माहिती वाचून ओके बटणावर क्लीक करावे.
तुम्हाला तुमची माहिती अपडेट करायची असेल तर ड्रॉप डाऊन मेन्यूवर जाऊन डॉक्यूमेट्स ऑप्शनवर क्लीक करा.
तुम्ही तुमचे डॉक्यूमेंट अपलोड केल्यावर तुमच्या आधारकार्डवरील माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया चालू होईल.
ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर एसआरएन नंबर जनरेट होईल. या नंबरच्या मदतीने तुम्ही अपडेट केलेली माहिती ट्रॅक करू शकता.
UIDAI कडून पूर्ण माहिती तपासून झाल्यावर तुमची माहिती अपडेट केली जाईल.