Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : दूरदर्शन ‘लोगो’च्या भगवेकरणावरून मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचीही टीका

Spread the love

चेन्नई : दूरदर्शनच्या लोगोचा रंग बदलण्यावरून देशात सर्वत्र राजकीय वादळ उठले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी दूरदर्शनचा ‘लोगो’ लाल ते भगव्या रंगात बदलण्यावर टीका केली आहे. ते रविवारी (२२ एप्रिल) म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रत्येक गोष्टीचे भगवेकरण करण्याच्या ‘षडयंत्राची’ ही सुरुवात आहे.

‘लोगो’मधील बदलाबाबत स्टॅलिन यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, दूरदर्शन ‘भगव्याने कलंकित’ झाले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, “भाजप प्रत्येक गोष्टीचे भगवेकरण करण्याचा कट रचत आहे. ही (‘लोगो’ बदलासारखी पावले) त्याची सुरुवात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जनता अशा फॅसिझमच्या विरोधात उभी राहताना दिसेल.

संत कवी तिरुवल्लुवर यांचाही उल्लेख

स्टालिन म्हणाले की, पहिले तमिळ संत कवी थिरुवल्लुवर यांचे “भगवाकरण ” करण्यात आले होते आणि “तमिळनाडूच्या महान नेत्यांच्या पुतळ्यांवर भगवा रंग लावण्यात आला होता.” दरम्यान या लोगोच्या रंग बदलाला विरोधकांनी ‘बेकायदेशीर, भाजप समर्थक आणि पक्षपाती’ असे म्हटले आहे.

निळा रंग परत आणा : ममता बॅनर्जी

दरम्यान शनिवारी, २१ एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दूरदर्शनच्या लोगोचा रंग बदलण्यावर प्रश्न उपस्थित केला होता. देशात भगवावाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शनिवारी संध्याकाळी सोशल मीडियावर दूरदर्शनचा लोगो शेअर करताना ममता बॅनर्जी यांनी लिहिले, “देशभर राष्ट्रीय निवडणुका होत असताना, आमच्या दूरदर्शनच्या लोगोचे अचानक भगवेकरण आणि रंग बदलल्याने मला धक्का बसला आहे ! हे पूर्णपणे अनैतिक, पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते की , “जेव्हा लोक निवडणूक मोडमध्ये असतात, तेव्हा भारतीय निवडणूक आयोग आदर्श आचारसंहितेत या रंग बदलाला परवानगी कशी देऊ शकते? ECI ने हे त्वरित थांबवावे आणि दूरदर्शनला त्याच्या लोगोचा मूळ निळा रंग परत आणण्यास सांगावे.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!