Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UP CrimeNewsUpdate : सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून दलित तरुणाचा मारहाणीत मृत्यू

Spread the love

बदायूं : उत्तर प्रदेशातील बदाऊनमध्ये सार्वजनिक नळातून पाणी पिण्यासाठी काही लोकांनी २४ वर्षीय दलित तरुणाला लाठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. अप्पर पोलिस अधीक्षक अमित किशोर श्रीवास्तव यांनी सांगितले की, उशैत पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मृताचे वडील जगदीश यांनी आरोप केला आहे की, सोमवारी रात्री त्यांचा मुलगा कमलेश (२४) याला सूरज राठोड आणि त्याच्या साथीदारांनी दारू पिण्यासाठी लाठीने मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की , बेदम मारहाण झाल्यानंतर कमलेशला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता मंगळवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू  झाला. या घटनेतील आरोपी सूरज राठोडला अटक करण्यात आल्याचे सांगून अप्पर पोलिस अधीक्षक  श्रीवास्तव म्हणाले की, कमलेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणाच्या सविस्तर तपासाचे आदेश देण्यात आले आहेत तसेच उजनीच्या अधिकारक्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी केली जाईल असेही ते म्हणाले .

पाण्यावरून झाला वाद ….

पोलीस अधिकारी अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, सूरज हा मयत कमलेशचा शेजारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कमलेशची मुलगी गावातील सार्वजनिक नळावर पाणी आणण्यासाठी गेली होती. तेथे पाणी गोळा घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सूरजने मुलीला शिवीगाळ केली. यानंतर कमलेशही तेथे अपनी आणण्यासाठी  पोहोचला तेंव्हा सूरजने त्याच्याशी वाद घातला. त्यावेळी काही स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण मिटवण्यात आले.

काठ्यांनी हल्ला केला…

मात्र, नंतर कमलेश शेतातून परतत असताना तिघा आरोपींनी त्याच्यावर काठ्यांनी हल्ला केला, त्यामुळे त्याला  गंभीर  दुखापत झाली. यानंतर आरोपी पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. अमित किशोर श्रीवास्तव यांनी पुढे सांगितले की, काही स्थानिक रहिवासी आणि कमलेशचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्याला रुग्णालयात नेले. जिथे त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी कमलेशच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे तीन जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!