#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
#MahanayakOnline | Top News | 11.November.2023
| दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
-
कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळणार. राज्य सरकारने पुढाकार घेऊन पुनर्विकास मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाच्या दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळावर सोपविण्यात आली आहे. दुरुस्ती मंडळाने येथे किती आणि कोणत्या स्वरुपाची बांधकामे आहेत, किती निवासी आणि अनिवासी गाळे आहेत याबाबत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या सर्वेक्षणासाठी मंडळाने आपल्या १५ विभागांतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण १५ वास्तुशास्त्रज्ञांची नियुक्ती करून सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या आधारे प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणी केली. त्याचा अहवाल नुकताच उच्च स्तरीय समितीला सादर केला होता. या व्यवहार्यतेला समितीने प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिली असून प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
अवकाळी पावसाचे थैमान : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्याकरिता हवामान खात्याने २९ व ३० नोव्हेंबरसाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे. विदर्भात अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
-
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हबाबत निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी पार पडणार आहे. त्यासह शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
-
उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) येतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली आहे. या बोगद्यात ४१ कामगार अडकले होते, त्यांची १७ दिवसांनी सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, या मजुरांसाठी उत्तरखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी प्रत्येक मजुराला एक एक लाख रुपयांची, मदतीची घोषणा केली आहे.
-
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सातत्याने सत्ताधाऱ्यांवर वेगवेगळे आरोप करत आहेत. देशातले वातावरण अस्थिर असून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर म्हणाले, येत्या सहा डिसेंबरनंतर म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानंतर देशात काहीही घडू शकते. हवं तर तुम्ही कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करा, कारण तशा पद्धतीच्या सूचना पोलिसांना मिळाल्या आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
For News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765