Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राहुल गांधी यांच्या वायनाडमध्ये किती झाले मतदान , मणिपूरमध्ये पुन्हा गडबड झाल्याची तक्रार …

Spread the love

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी (26 एप्रिल) संपले. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, ईशान्येकडील त्रिपुरा राज्यात सर्वाधिक ७८.६३ टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशात सर्वात कमी 54.83 टक्के मतदान झाले. मणिपूर दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे ७७.१८ टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनेही भाजपवर आरोप केले.

दुसऱ्या टप्प्यात १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ८९ लोकसभा जागांवर मतदान झाले. या काळात अनेक व्हीआयपी जागांवरही मतदान झाले. केरळमधील वायनाड मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक रिंगणात आहेत. वायनाड मतदारसंघात ६९.५१ टक्के मतदान झाले. अरुण गोविल हे उमेदवार असलेल्या उत्तर प्रदेशातील मेरठ मतदारसंघात ५८.७० टक्के मतदान झाले.

काँग्रेसने मणिपूरमधील मतदानावर प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून मणिपूरमध्ये काँग्रेसला मतदान करणाऱ्या लोकांना एनडीएच्या बाजूने मतदान करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप केला आहे. हा सर्व प्रकार सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, मणिपूरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, काँग्रेसने ईव्हीएम फोडणे, बुथवर कब्जा करणे, मतदानात हेराफेरी असे आरोप केले आहेत. या घटनांची नोंद बाह्य लोकसभा मतदारसंघात करण्यात आली आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

एनडीएला प्रचंड पाठिंबा मिळत आहे : नरेंद्र मोदी

पीएम मोदींनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले की, “दुसरा टप्पा खूप चांगला होता. आज (२६ एप्रिल) मतदान करणाऱ्या भारतातील जनतेचे आभार. एनडीएला मिळत असलेला प्रचंड पाठिंबा विरोधकांना आणखी निराश करणार आहे. मतदारांना सुशासन हवे आहे. एनडीए.” तरुण आणि महिला मतदार एनडीएला जोरदार पाठिंबा देत आहेत.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!