Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, मतदानानंतर मनोज जरांगे यांचे मतदारांना आवाहन …

Spread the love

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज लोकसभेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले . प्रकृती अस्वास्थामुळे जरांगेंवर उपचार सुरु आहेत. पण त्यांनी अॅम्ब्युलन्समधून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, असे आवाहन केले. आपले उमेदवार नसले तरी पाडण्यातही आपला विजय असेल असे मनोज जरांगे म्हणाले.

मी सांगितलं होतं कुणालाही मतदान करा, समाजाच्या खांद्यावर जबाबदारी आहे. सगेसोयरेच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच या बाजूने असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजाने करावे. जरी आपण उमेदवार दिलेला नाही, पाठिंबाही दिला नाही. पण पाडण्यातही आपला विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. उभाच राहावे किंवा उमेदवार द्यावा असे काही नाही, पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. जर सहा जूनच्या आत आरक्षण दिले नाही तर देणारे बनू, विधानसभेला मैदानात मी सुद्धा असेन… कारण मराठा, मुस्लिम, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. बारा बलुतेदार दलित बांधव सगळ्यांचा प्रश्न आहे.त्यामुळे आपण देणारे बनू उगाच काहीही अफवा पसरवल्या जात आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी दोघे सारखेच आहेत हे म्हणण्याचा माझा अर्थ होता, या दोघांनी मिळून आमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, दोघांनी लेकरांचं वाटोळं केलं, असे मनोज जरांगे म्हणाले.

आरक्षण विरोधकाला असा पाडा, पाच पिढ्या उभ्या राहायला नको : मनोज जरांगे

मनोज जरांगे म्हणाले, आपला उमेदवार नसल्यामुळे, तुम्ही मतदान कोणालाही करा, पण जे सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल त्याला करा. इतक्या ताकदीने विरोधकाला पाडा की कमीत कमी पाच पिढ्या निवडणुकीला उभ्या राहिल्या नसल्या पाहिजेत. मराठ्यांनी एकजूट दाखवा. 288 पैकी 92-93 मतदारसंघ असे आहेत जिथे मराठ्यांचं वर्चस्व आहे. माझा राजकीय मार्ग नाही, मला तिकडे जायचं नाहीय, पण मला तुम्ही तिकडे न्यायचा प्रयत्न करताय तर माझा नाईलाज आहे. मराठा समाजासह लिंगायत समाज सर्व एकत्र येऊ. प्रश्न गोरगरिबांचा आहे, आम्हाला देणारे बनावे लागेल.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!