Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

Spread the love

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि ३५४ (ए) आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17 वर्षीय मुलीच्या आईने 2 फेब्रुवारी रोजी अधिकृत बाबींच्या संदर्भात एका बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध POCSO (लैंगिक अत्याचार) अंतर्गत आणि कलम 354 A (लैंगिक छळ) प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या आईने केलेल्या आरोपांनतर येडियुरप्पा यांनी कोणतेही जाहीर वक्तव्य जारी केलेलं नाही.

पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2 फेब्रुवारी रोजी मी मुलीसह येडियुरप्पा यांच्या घरी जाऊन एका प्रकरणात मदत मदत मागण्यासाठी गेली तेंव्हा हा प्रकार घडला. येडियुरप्पा यांनी माझ्या मुलीला एका खोलीत नेले आणि दरवाजा बंद केला. ज्या खोलीत त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे त्या खोलीत ते पाच मिनिटे थांबले. परत आल्यावर, जेव्हा तिने येडियुरप्पा यांना असे का केले असे विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की मी मुलीवर बलात्कार झाला आहे की नाही हे तपासत आहे. तथापि, बीएस येडियुरप्पा यांनी नंतर माफी मागितली आणि हे प्रकरण बाहेर कोणाला सांगू नये असे सांगितले.
या प्रकरणी सदाशिवनगर पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (लैंगिक छळ) कलम 8 आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 354 (अ) (लैंगिक छळ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा एसआयटीद्वारे तपास करण्याची मागणी पीडित मुलीच्या आईने केली आहे. येडियुरप्पा यांनी 2008 ते 2011, मे 2018 मध्ये आणि त्यानंतर जुलै 2019 ते 2021 पर्यंत असे तीन वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!