Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CrimeNewsUpdate : बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केली म्हणून भावाने केले हे भयानक कृत्य ….

Spread the love

औरंगाबाद : बहिणीच्या प्रेम विवाहाला मदत केली म्हणून येथे भावाने २४ वर्षाच्या तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी तरुणाच्या डोक्यावरून तब्बल चार वेळा बोलेरो कार घातल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजीनगरातील शेंदूरवादा- सावखेडा महामार्गावर ही घटना घडली असून पवन शिवराम लोढे (वय २४वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे मृत तरुणाचे पुढील आठवड्यात लग्न होते. घरात लग्नाची तयारी केली जात होती. परंतु या घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

नेमकं काय घडलं?

या घटनेची अधिक माहिती अशी की , पुढच्या आठवड्यात विवाह असल्याने मृत तरुण आपल्या वडिलांसोबत बँकेतून पैसे आणायला बाहेर गेला होता. यावेळी त्याच्या दुचाकीला बोलेरोने जोरदार धडक दिली. विशेष म्हणजे तरुण खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून त्याची हत्या करण्यात आली. औरांगाबादच्या वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदूरवादा- सावखेडा महामार्गावर ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीच्या बहिणीचा प्रेमविवाह व्हावा यासाठी मृत तरुणाने प्रयत्न केले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

मृत पवन हा शेतकरी असून त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जावून विवाह केला होता. त्यांच्या विवाहाला पवन याने मदत केली होती. याचाच राग मनात धरून संशयित आरोपींनी बोलेरोने पवनच्या दुचाकीला जोरदार दिली. यामध्ये पवन गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पवनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!