Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUdate : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात दुचाकीवरून सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आले होते. तेव्हा त्यांनी तिथे ३-४ राऊंड फायर केल्याची माहिती आहे. हा गोळीबार कोणी केला याबाबत सध्या काहीही माहिती नसून पोलीस याचा शोध घेत आहेत. ही घटना घडली तेव्हा सलमान खान घरीच होता. याआधीही सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत.

दरम्यान कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका टेलिव्हिजन मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोईने उघडपणे सांगितले होते की, सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्यातील उद्दिष्ट आहे. अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानावरही लॉरेन्स बिश्नोईने हल्ला केला होता आणि सलमान खानसोबतच्या जवळच्या संबंधांमुळे हा हल्ला झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्याच्यार संशयाची सुई आहे.

Advertisements

पहाटे ४.५५ वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त सलमान खानच्या घराबाहेर आहे. पोलिस सलमान खानकडून याबाबतची माहिती घेत आहेत. तसेच, सुरक्षा रक्षक, खाजगी सुरक्षा रक्षकांकडूनही माहिती घेतली जात आहे. फॉरेन्सिक टीमही याठिकाणी दाखल झालेली आहे.

Advertisements
Advertisements

लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. सलमान खानला सध्या वाय प्लस सुरक्षा पुरवली जाते. गेल्या वर्षी सलमान खानच्या ऑफिसला धमकीचा ईमेलही पाठवण्यात आला होता. सलमान खानच्या जवळच्या प्रशांत गुंजाळकरला रोहित गर्गकडून धमकीचा मेल आला होता. या ईमेल प्रकरणात आयपीसीच्या कलम ५०६ (२), १२० (बी) आणि ३४ अंतर्गत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या मागे बिश्नोई गँग असल्याचा संशय मुंबई गुन्हे शाखेला आहे. त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेने त्या दृष्टीने पुढील तपास सुरु केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

1998 साली हम साथ साथ हैं चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता.
सलमान खानने दोन वेळा चिंकारा हरणांची शिकार केल्याला आरोप आहे.
लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात हरणांना देवासमान मानले  जाते.
हरणांची शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे.
याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!