Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुढील तीन ते चार दिवस मराठवाडा , महाराष्ट्रात पावसाची शक्यता

Spread the love

मुंबई : देशात सध्या अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत. महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने   थैमान घातले  आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने  झोडपले  आहे. अनेक जिल्ह्यात शेती, फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. काही भागात गारपीटही झाली आहे. आज रविवारीही राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. पुढील 72 तासात जोरदार पावसाचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे. तर, पुढील 48 तासात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. काही भागांमध्ये गाटपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, राज्यासह देशात अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण पाहायला मिळत आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

आज रविवारी भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!