Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : अमेरिकन राष्ट्रध्वजासोबत जेंव्हा डौलाने फडकला निळा , जर्सी सिटीत रंगला भीम जयंतीचा नेत्रदीपक सोहळा …

Spread the love

निनाद खाडे | जर्सी सिटी, अमेरिका : अमेरिकेतील जर्सी सिटी NJ – 11 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्ताने सिटी हॉलमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाबरोबर सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या निळ्या ध्वजाचेही दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. हे दोन्हीही ध्वज आसमंतात डौलाने फडकत असून सर्व अमेरिकावासियांना समानता आणि सर्व समावेशकतेचा संदेश देत आहे. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन यूएसए यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला कौन्सिल वूमन मीरा प्रिंझ एरे आणि कौन्सिल मन जेम्स सोलोमन यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र , राज्यशास्त्र, मानवी नागरी हक्क, धार्मिक व्यवस्था आणि न्यायशास्त्र या क्षेत्रातील योगदानाचा जगभरावर झालेला परिणाम आणि त्याचे महत्व आपल्या भाषणातून विशद केले. त्यांच्या विचारांमुळेच लोकशाही मूल्ये , अखंड समता आणि सर्व जाती, वंश ,लिंग, धर्म आणि लोकांसाठी न्याय यांचा प्रसार झाला आहे असे विचार कौन्सिल मन सोलोमन यांनी व्यक्त केले.

आंबेडकर इंटरनॅशनल मिशन यूएसए या संघटनेने या कार्यक्रमाचा प्रारंभ 2022 मध्ये केला होता. जर्सी शहरात 14 एप्रिल हा दिवस समानता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा उपक्रम म्हणजे जर्सी सिटीची विविधता आणि समावेशकतेसाठीची वचनबद्धता देशभरातील समुदायांसाठी एक प्रेरणा आहे . ज्यामुळे डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केलेल्या मूल्यांचे समर्थन करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देते. डॉक्टर आंबेडकरांच्या आदर्शांना मिळालेला व्यापक पाठिंबा आणि सर्वांसाठी समानतेचा पुरस्कार करण्यासाठी शहराचे समर्पण या कार्यक्रमाने त्रिराज्य क्षेत्रातून उपसताना आकर्षक आकर्षित करते .

आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ही भारताबाहेरील आंबेडकरी जनतेची सर्वात जुनी संघटना असून जर्सी सिटी हॉलच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन आणि त्यांच्या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी ambedkarMission.org भेट देता येईल.. हे इंटरनॅशनल मिशन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण आणि आदर्श जागृत करणे, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आणि वंचित समाजाचे सक्षमीकरण करणे यासाठी ही संघटना कटिबद्ध असून त्यासाठी विविध उपक्रम या आणि कार्यक्रम या संघटनेद्वारे आयोजित केले जातात

आपलं सरकार

Click to listen highlighted text!