Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaAghadiNewsUpdate : काँग्रेस आणि इंडिया आघाडीची दुहेरी लढाई , एक पक्षांतर्गत आणि दुसरी भाजपशी , तीन जागांवर मोठा धक्का…

Spread the love

नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इंडिया आघाडी भाजपशी कडवी झुंज देत आहेत तर दुसरीकडे त्यांचे तीन उमेदवार भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करून देशभर चर्चेचा विषय झाले आहेत. विशेष म्हणजे यावर पक्ष नेतृत्वाने मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.भाजपला मात्र या निमित्ताने निवडणूक निकाल लागण्याच्या आधीच तीन खासदार मिळाले आहेत. मग यामध्ये मध्य प्रदेशातील खजुराहोमधील उमेदवारी नाकारणे असो, गुजरातमधील सुरतमधील वॉकओव्हर असो किंवा इंदूरमधील ताजे प्रकरण, जिथे विरोधी उमेदवार भाजपमध्ये सामील झाला.

खजुराहोमध्ये मतदानापूर्वी काँग्रेसची निराशा झाली

ही घटना 8 एप्रिल 2024 ची आहे. मध्य प्रदेशातील निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीच्या पदरी निराशाच पडली. येथील जागा वाटपाअंतर्गत खजुराहोची जागा अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी (SP)च्या उमेदवार मीरा दीपक यादव यांना देण्यात आली मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला, त्यानंतर सपा आणि काँग्रेसजनांमध्ये सर्वाधिक निराशा दिसून आली. विशेष म्हणजे या जागेवर काँग्रेसचा जनाधार होता. तरीही ही जागा सपाला देण्यात आली होती.

खजुराहोमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा हे सलग दुसऱ्यांदा भाजपचे उमेदवार आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी सुमारे साडेपाच लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. अशा स्थितीत सपा आणि काँग्रेससमोर कोणाला पाठिंबा द्यायचा हा मोठा पेच होता, कारण राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून बहुजन समाज पक्षाचे (बसपा) कमलेश पटेल हेच रिंगणात आहेत. तथापि, 15 एप्रिल 2024 रोजी काँग्रेसने या जागेवरून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार आरबी प्रजापती यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

सुरतमध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी झाला

दुसऱ्या घटनेत गुजरातमधील सुरत मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज 20 एप्रिल 2024 रोजी अपात्र ठरविण्यात आला. कारण त्यांच्या उमेदवारी अर्जावरील तीन प्रस्तावकांनी (रमेश पालारा, जगदीश सावलिया आणि ध्रुविन ढमेलिया) दावा केला की त्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांनी स्वाक्षरीच केलेली नाही, त्यांच्याशिवाय इतर नऊ उमेदवार रिंगणात राहिले, ज्यात बसपचे उमेदवार प्यारेलाल भारती आणि आठ अपक्ष परंतु या सर्वांनीच माघार घेतली. त्यामुळेच निवडणूक निकालापूर्वीच तेथे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता सुरतच्या जागेवर निवडणूक होणार नाही. राज्यात लोकसभा निवडणुकीत उमेदवार बिनविरोध जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. सुरतमध्ये 1990 पासून भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होत आहेत, तर गुजरातमधील बहुतांश मतदारसंघांमध्ये दोन पक्षांमध्ये (काँग्रेस आणि भाजप) लढत आहे.

इंदूरमध्ये धक्का, काँग्रेस उमेदवाराची माघार

दरम्यान दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी इंदूरच्या जागेवरील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी मागे घेतली आणि इतकेच नव्हे तर त्यांनी तातडीने भाजपात प्रवेश घेतला. ताज्या घडामोडींपूर्वी इंदूरमध्ये काँग्रेसचे अक्षय कांती बम आणि भाजपचे उमेदवार शंकर लालवाणी यांच्यात लढत होण्याचा विचार केला जात होता, मात्र आता चित्र वेगळे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत इंदूरमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. विशेष म्हणजे इंदूरमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही आणि आता तर त्यांचा उमेदवारच भाजपमध्ये गेला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!