Employment News Update : शहरी पुरुषांच्या बेरोजगारीत वाढ , माहिलांच्या टक्क्यात मात्र किंचित वाढ ….
मुंबई : लेबर फोर्स सर्व्हेच्या मागील तिमाहीच्या तुलनेत बेरोजगारीचा दर वाढला असून यामध्ये शहरी पुरुषांची बेरोजगारी अधिक वाढली आहे. यात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींच्या बेरोजगारीत वाढ झाली असून शहरी भागातील बेरोजगारीचा दर जानेवारी-मार्च दरम्यान 6.7% पर्यंत वाढला आहे, ऑक्टोबर-डिसेंबर 2023 दरम्यान हा दर 6.5% होता.
ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात जानेवारी-मार्चमध्ये पुरुषांसाठी बेरोजगारीचा दर 6.1% पर्यंत वाढला, जो ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 5.8% होता. मात्र महिलांबाबत बोलायचे झाले तर या काळात महिलांची बेरोजगारी कमी झाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 8.6% असलेला बेरोजगारीचा दर जानेवारी-मार्च दरम्यान 8.5% पर्यंत वाढला.
22व्या पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) नुसार, मार्च 2024 मध्ये शहरी भागात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी बेरोजगारीचा दर 6.7% होता. डेटावरून असेही दिसून आले आहे की शहरी भागातील 15 वर्षांवरील महिलांमधील बेरोजगारीचा दर जानेवारी-मार्च 2024 मध्ये 8.5 टक्क्यांवर घसरला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 9.2 टक्के होता. एप्रिल-जून 2023 मध्ये तो 9.1%, जुलै-सप्टेंबर 2023 मध्ये 8.6% आणि ऑक्टोबर-डिसेंबर 2023 मध्ये 8.6% होता.
पुरुष बेरोजगारी दर असा आहे …
पुरुषांमधील शहरी भागातील बेरोजगारीचा दर मार्च तिमाहीत वाढून 6.1% झाला आहे, जो एका वर्षाच्या आधीच्या याच कालावधीत 6% होता. एप्रिल-जून 2023 मध्ये तो 5.9%, जुलै-सप्टेंबर 2023 मध्ये 6% आणि ऑक्टोबर-डिसेंबर 2023 मध्ये 5.8% होता.
आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की शहरी भागात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या काम करणाऱ्यांची संख्या (कामगार शक्ती सहभाग दर) वाढला आहे. त्याचा दर ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 49.9% होता, जो जानेवारी-मार्चमध्ये वाढून 50.2% झाला. जर आपण पुरुषांबद्दल बोललो तर त्यांचा सहभाग दर 74.1% वरून 74.4% पर्यंत वाढला. तर महिलांचा सहभाग दर 25% वरून 25.6% पर्यंत वाढला आहे.