Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

DiwaliNewsUpdate : जाणून घ्या बँकांना दिवाळीच्या सुट्या किती दिवस आहेत ?

Spread the love

मुंबई: भारतात सण उत्सव सुरू झाले आहेत. दिवाळी हा उत्सव सर्वात मोठा आणि आनंदाने साजरा केला जातो. दिवाळीनिमित्त शाळा महाविद्यालंय आणि सरकारी कार्यालयं बंद राहतात. दिवाळीची सुट्टी ही शेअर मार्केट आणि बँकांनाही असते. यावर्षी 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर असे दोन दिवस दिवाळी साजरी होत आहे.

भारतातील परंपरा आणि चालीरीतींमुळे, दिवाळीच्या बँक सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. RBI लोकांच्या सोयीसाठी सुट्ट्यांची यादी महिना सुरू होण्याआधीच जाहीर करते . त्यामुळे लोकांना बँकेतील कामाचं नियोजन करणे  अधिक सोपे होते. दिवाळी निमित्ताने या दोन दिवसांपैकी तुमच्या विभागात कधी बँक बंद राहणार जाणून घेऊया.

31 ऑक्टोबर (गुरुवार) – दिवाळी

दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, तेलंगणा आणि तामिळनाडू तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यासारख्या अनेक राज्यांमध्ये 31 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील. त्याच वेळी, त्रिपुरा, महाराष्ट्र, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर आणि मेघालयमध्ये या दिवशी बँका सुरू राहतील.

1 नोव्हेंबर (शुक्रवार)- दिवाळी, कुटा उत्सव आणि कन्नड राज्योत्सव

त्रिपुरा, कर्नाटक, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, मेघालय, सिक्कीम आणि मणिपूरमध्ये 1 नोव्हेंबर रोजी कुट सण, कन्नड राज्योत्सव आणि दिवाळीनिमित्त बँका बंद राहतील.

2 नोव्हेंबर (शनिवार)- दिवाळी (बळी प्रतिपदा), लक्ष्मी पूजा, गोवर्धन पूजा, विक्रम संवत नवीन वर्ष

2 नोव्हेंबर रोजी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये बँका बंद राहतील, कारण या दिवशी बली प्रतिपदा, गोवर्धन पूजा आणि विक्रम संवत नवीन वर्ष साजरे केले जाणार आहे.

महाराष्ट्रात 4 दिवसांचा मोठा वीकेंड

कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांना दिवाळीनिमित्त सलग 4 दिवस सुटी मिळणार आहे. 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत बँका बंद राहतील, त्यानंतर 3 नोव्हेंबर रविवार आहे. अशा प्रकारे सलग 4 दिवस बँकांना सुट्ट्या असतील. याशिवाय उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये लोक 3 दिवसांच्या सुट्टीचा लाभ घेऊ शकतात. तेथील बँका 1 नोव्हेंबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील आणि त्यानंतर 3नोव्हेंबर रविवार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!