Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मेरे देश मे ….दिवाळीत मुस्लिमांकडून काहीही खरेदी न करण्याचे बजरंग दल नी भाजप नेत्याचे आवाहन

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली :  दिवाळीपूर्वी देशातील अनेक राज्यांमध्ये बजरंग दलाचे होर्डिंग्ज आणि यूपी भाजपच्या एका नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. यूपीचे माजी भाजप खासदार हरीश द्विवेदी यांनी हिंदूंच्या दुकानातूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात बजरंग दलाने भोपाळपासून देवासपर्यंत हिंदूंना दिवाळीची खरेदी करण्यास सांगणारे होर्डिंग्ज लावले आहेत.

तथापि, बजरंग दलाने लावलेल्या होर्डिंग्जमध्ये भाजप नेत्याप्रमाणे हिंदूंकडून खरेदी केल्याबद्दल उघडपणे बोलत नाही. बजरंग दलाच्या पोस्टरवर लिहिले आहे की, ‘आपला सण, आपल्याच माणसांसोबत साजरा करा ‘. जे तुमच्या खरेदीसह दिवाळी साजरी करू शकतात त्यांच्याकडूनच दिवाळीला खरेदी करा.

Advertisements

‘फक्त सनातनी परिवाराकडूनच खरेदी करा’

बस्ती, यूपीचे माजी खासदार हरीश द्विवेदी यांनी X वर पोस्ट करताना लिहिले की, “हिंदूंचा पवित्र सण धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, तुम्हा सर्व सनातन धर्मीय बांधवांना विनंती आहे की, फक्त तुमच्या सनातनी दुकानातूनच खरेदी करा. आणि आपला सण आपल्या  कुटुंब आणि  प्रियजनांसोबतसाजरा करा .

Advertisements
Advertisements

वास्तविक पाहता , चीनमधून येणाऱ्या मालाबाबत सहसा असे वातावरण पाहायला मिळते. दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणाच्या आधी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन समोर येते. मात्र, भाजप नेत्याचे आवाहन थेट मुस्लिमांशी जोडले जात असल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची टीका …..

हा रकार समोर येताच  काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्याचवेळी बिहारमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूने या प्रकरणी मुस्लिम मतदारांना राजकीय नुकसान होऊ नये, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जेडीयूच्या प्रवक्त्या अंजुम आरा म्हणाल्या की, आपल्या देशात गंगा जमुना संस्कृती आहे. छठ सणाच्या वेळी मुस्लिम स्त्रिया उपवास ठेवतात आणि चुलीवर स्वयंपाक करतात आणि त्याच  चुलीवर हिंदू धर्माच्या स्त्रिया छठ उपवास करतात.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!