Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GoodNews : भारत सरकारकडून 41 औषधांच्या किमती करण्याचा निर्णय ….

Spread the love

नवी दिल्ली : भारत सरकारने हृदय आणि यकृत यांसारख्या अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. साखर, वेदना, हृदय, यकृत, संसर्ग, ऍलर्जी, मल्टीविटामिन, अँटासिड, अँटीबायोटिक्ससह 41 औषधांचा समावेश असलेल्या 41 औषधांचे आणि 6 फॉर्म्युलेशनचे दर सरकारने निश्चित केले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (NPPA) 143 व्या बैठकीत औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय याबाबत राजपत्रात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. याशिवाय कंपन्यांना ही माहिती डीलर्सला तातडीने देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. औषध कंपन्या ग्राहकांकडून औषधाच्या किंमतीव्यतिरिक्त फक्त जीएसटी आकारू शकतात, असेही सरकारी निर्देशांमध्ये म्हटले आहे.

औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण

देशातील अनेक लोक ॲलर्जी, इन्फेक्शन, शुगर, पेनकिलर, हृदय, यकृत, मल्टीविटामिन, अँटिबायोटिक्स इत्यादी समस्यांशी झुंजत आहेत. या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे खूप महाग आहेत. या औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने एनपीपीएच्या बैठकीत 41औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!