Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“संविधान आमचे गीता , रामायण, महाभारत, कुराण , बायबल …. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले तरी संविधान संपवू शकत नाहीत… : नरेंद्र मोदी उत्तरले !!

Spread the love

जयपूर : अब की बार ४०० पारचा संकल्प घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर मोदी सरकारची गॅरंटी घेऊन प्रचाराला निघाले आहेत. या प्रचारा दरम्यान संविधान बदलाच्या मुद्याला उत्तर देताना मोदी म्हणाले कि , आमच्यासाठी ४०० जागांचे ध्येय जनतेने यासाठी ठेवले की, गेल्या १० वर्षात तुम्ही मला संसदेत चांगले काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देश काँग्रेसला शिक्षा देऊ इच्छित आहे. काँग्रेसला देशातून साफ कण्याचा प्रयत्न करत आहे. जेथे संविधानाचा प्रश्न आहे तेथे तुम्ही माझे शब्द लिहून ठेवा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत. संविधान सरकारसाठी गीता, रामायण, महाभारत, बायबल, कुराण आहे. हे सर्व आमच्यासाठी संविधान आहे. हे इंडिया आघाडीवाले द्वेषाने भरलेले आहेत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भाजपच्या एका मंत्र्याने स्वतः कर्नाटकात बोलताना भाजपाला ४०० पार जागा संविधान बदलण्यासाठी हव्या आहेत असे म्हटल्यानंतर भाजप संविधान बदलणार असल्याची चर्चा देशभरात सुरु झाली. या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा काँग्रेसचा जुना प्रचार आहे असे सांगून म्हणाले की , “डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत.. संविधान सरकारसाठी गीता, रामायण, महाभारत, बायबल, कुराण आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

दरम्यान काँग्रेसवर टीका करताना , “एससी, एसटी, ओबीसींबरोबर अनेक दशकांपासून भेदभाव करणारी काँग्रेस आजकाल एक जुने रेकॉर्ड वाजवत आहे. जेव्हा निवडणूक येते तेव्हा संविधानाच्या नावावर खोटे बोलणे ही इंडिया आघाडीची फॅशन झाली आहे. ज्या काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांना निवडणुकीत हरवले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने भारतरत्न मिळू दिला नाही. ज्या काँग्रेसने देशात आणीबाणी लावली, संविधान संपवण्याचा प्रयत्न केला, आज तीच काँग्रेस मला शिव्या देण्यासाठी संविधानाच्या नावाखाली खोटे बोलत आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “पण हे ते मोदी आहेत, त्यांनी देशात पहिल्यांदा संविधान दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. याच काँग्रेसवाल्यांनी संविधान दिवस साजरा करायला विरोध केला होता. याबाबतचे त्यांचे संसदेमध्ये भाषणदेखील आहे. मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अपमान आहे की नाही? हा संविधानाचा अपमान आहे की नाही? एवढेच नाही, हे ते मोदी आहेत, ज्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पंचतीर्थांचा विकास केला. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खोटेपणापासून सावध राहण्याची गरज आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

इंडिया आघाडीवाले द्वेषाने भरलेले…

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “काँग्रेसल्यांनी हे लक्षात ठेवावे, ४०० जागांचे ध्येय जनतेने यासाठी ठेवले की, गेल्या १० वर्षात तुम्ही मला संसदेत चांगले काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देश काँग्रेसला शिक्षा देऊ इच्छित आहे. काँग्रेसला देशातून साफ कण्याचा प्रयत्न करत आहे. जेथे संविधानाचा प्रश्न आहे तेथे तुम्ही माझे शब्द लिहून ठेवा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत. संविधान सरकारसाठी गीता, रामायण, महाभारत, बायबल, कुराण आहे. हे सर्व आमच्यासाठी संविधान आहे. हे इंडिया आघाडीवाले द्वेषाने भरलेले आहेत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!