Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदी 24 तास धर्मावर बोलतात , हिंदू मुस्लीम यांच्यावर चर्चा करतात, देशाची चेष्टा करतात , राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Spread the love

भंडारा : मोदी 24 तास धर्मावर बोलतात , मोदी धर्म आणि हिंदू मुस्लीम यांच्यावर चर्चा करतात. कोरोनामध्ये हजारो माणसे मरत असताना थाळ्या, टाळ्या वाजवायला सांगतिल्या. मोदी देशाची चेष्टा करीत आहेत अशा शब्दात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या पहिल्याच सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर घणाघाती हल्ला चढवला. आम्ही हरितक्रांती, दूधक्रांती, बँकाचे राष्ट्रीयीकरण करतो, पण मोदी 24 तास धर्मावर बोलतात, पुजारी नसलेल्या ठिकाणी समुद्राखाली आर्मी लावून पूजा करतात, अशा शब्दात टीकास्त्र सोडले.

महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भंडाऱ्याच्या साकोलीत सभा पार पडली. यात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच केंद्र सरकारने सुरु केलेली अग्नीवीर योजना रद्द करण्यासह अनेक घोषणा राहुल गांधींनी केल्या आहेत.

काँग्रेसकडून गँरेंटींचा पुनरुच्चार

दरम्यान राहुल यांनी यावेळी बोलताना, काँग्रेसकडून देण्यात आलेल्या गँरेंटींचा पुनरुच्चार करताना महिला, युवक, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. महिलांना हक्काचे महिन्याला 8 हजार 500 रुपये देणार असल्याचेही ते म्हणाले. राहुल यांनी भंडाऱ्यातील सभेत देशात मागासवर्गीयांना मिळत नसलेल्या हक्कांवर भाष्य केले. त्यामुळे इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करताच सरकार येताच जातीय जणगणना, आर्थिक आणि संस्थात्मक सर्व्हे करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे जातीच्या तुलनेत कोण किती प्रतिनिधीत्व करत आहे याची आकडेवारी देशसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या राष्ट्रपतींना आदिवासी म्हणून त्यांना राम मंदिर लोकार्पण सोहळ्यात जाऊ दिले नाही. तिथे अदानी, अंबानी होते. पण एकही मागासवर्गीय नव्हते, असा आरोपही त्यांनी केला.

शेतकऱ्यांना कर्जमाफी

राहुल यांनी पीएम मोदी यांनी देशामध्ये चेष्ठा लावल्याची टीका केली. कोरोनामध्ये हजारो माणसे मरत असताना थाळ्या, टाळ्या वाजवायला सांगितल्याची टीका त्यांनी केली. राहुल यांनी सत्तेत येताच अग्नीवीर योजना घोषणा रद्द करणार असल्याचेही सांगितले. देशातील उद्योगपतींचे कर्ज माफ होत असतानाच शेतकऱ्यांचे का होत नाही? अशी विचारणा करताना त्यांनी ज्या पद्धतीने आम्ही पहिली कर्जमाफी दिली त्या पद्धतीने कर्जमाफी देऊ, असेही सांगितले.

राहुल म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत मोदीजी यांनी काही निवडक करोडपती उद्योगपती अदानी यांच्यासाठी सरकार चालवले. मोदीचे सरकार आले तर अदानींचे शेअरचे भाव वाढतात, हे अदानीचे सरकार आहे. सीबीआय, ईडीचा दबाव आणून मुंबईचे विमानतळ अदानींकडे दिले आहे. भारतातील सर्व पोर्ट यांच्या हातात आहेत. त्यांनी सांगितले की, देशातील आज 22 असे लोकांकडे जेवढी संपत्ती आहे. तेवढीच संपत्ती या देशातील 70 टक्के लोकांकडे आहे. जीएसटीच्या रुपाने तुमच्याकडील पैसे जातात. तुम्ही तेवढा कर देता, जेवढे गौतम अदानी देतात, असेही त्यांनी सांगितले.

राहुल गांधी म्हणाले की, आमच्या जाहीरनाम्यात पाच मोठी आश्वासने दिली आहेत. हजारो लोकांशी चर्चा करुन हा जाहिरनामा बनवण्यात आला आहे. त्यामुळे हा जनतेचा जाहिरनामा आहे. तुमच्या मनातली बाब आम्ही यात लिहिली आहे. गेल्या १० वर्षात मोदीजी यांनी काही निवडक करोडपती उद्योगपती अदानी यांच्यासाठी सरकार चालवले. मोदीजी यांचे सरकार आले तर अदानी यांच्या शेअरचे भाव वाढतात. हे अदानीचे सरकार आहे, असा हल्लाबोल त्यांनी मोदी सरकारवर केला.

पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना रद्द करणार

आमचे सरकार आले की पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना रद्द करणार आहे, अशी मोठी घोषणा राहुल गांधींनी केली आहे. ही योजना आर्मीने नाही. तर पंतप्रधान कार्यालयाने बनविली आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. याशिवाय गरीबी रेषेच्या खालील महिलांच्या बँक खात्यात वर्षाला एक लाख रुपये देणार आहोत. चुकीची जीएसटी लागू केलीय. याला आम्ही बदलणार. त्यामुळे एक टॅक्सच असेल कमीत कमी असेल. युवकांसाठी अप्रेंटिपीस योजना आणणार, पेपर लीक करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार, खासगी कंपन्यांकडून परीक्षा बंद करणार, पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, अशा घोषणा यावेळी राहुल गांधी यांनी केल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!