Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबईच्या प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीम पार्लरवर FDA ची धाड; परवाना निलंबित ९ लाखांचा माल जप्त

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यात दूध भेसळ आणि अस्वच्छ अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेत मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम अँड कंपनी या आईस्क्रीम पार्लरवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. चर्चगेटजवळील या प्रसिद्ध दुकानावर ७ आणि ८ जुलै रोजी टाकलेल्या छाप्यात अस्वच्छतेचे गंभीर प्रकार उघडकीस आले असून दुकानाचा अन्न परवाना तातडीने निलंबित करण्यात आला आहे.

Advertisements

FDA च्या तपासणीदरम्यान आईस्क्रीम तयार करण्याच्या आणि साठवणुकीच्या ठिकाणी जिवंत उंदीर, माशा आणि कालबाह्य फ्लेवर्सचा साठा आढळून आला. काही उंदीर अधिकाऱ्यांच्या पायाजवळ फिरताना दिसल्याचे तपास पथकाने नमूद केले. पिस्ता, स्ट्रॉबेरीसह विविध फ्लेवर्सचे एक्सपायरी साहित्यही जप्त करण्यात आले.

Advertisements
Advertisements

तपासात आईस्क्रीमसाठी आवश्यक कोल्ड चेनचे पालन करण्यात आले नसल्याचे तसेच उत्पादनातील मिल्क फॅटचे प्रमाण ७.९४ टक्के असल्याचे समोर आले. FSSAI च्या नियमानुसार आईस्क्रीममध्ये किमान १० टक्के मिल्क फॅट असणे आवश्यक आहे. याशिवाय स्वच्छतेचा अभाव, आवश्यक नोंदी न ठेवणे आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले.

FDA ने सुमारे ९ लाख रुपयांचे आईस्क्रीम व कच्चा माल जप्त केला असून खराब झालेला माल जागेवरच नष्ट करण्यात आला. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत के. रुस्तम अँड कंपनीचा फूड लायसन्स निलंबित करून दुकान तातडीने बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, छाप्यादरम्यान दुकान मालकांनी परिसरातील उंदरांना ‘पाळीव प्राणी’ असल्याचे सांगितल्याची चर्चाही समोर आली असून या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

राज्यभरातही FDA ची धडक कारवाई

९ जुलै रोजी राज्यभरातील पाच ठिकाणी FDA ने छापे टाकून २,२७२ किलो दूध व दुग्धजन्य पदार्थ जप्त केले. जप्त मालाची किंमत १.६२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईतील गौतम दुग्धालय (घाटकोपर) येथून ५३० किलो दूध, बासुंदी आणि आईस्क्रीम जप्त करण्यात आले. लेबलिंग नियमांचे उल्लंघन, अस्वच्छ साठवणूक आणि कोल्ड स्टोरेजच्या त्रुटींमुळे संबंधित परवाना निलंबित करण्यात आला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सिद्धेश्वर मिल्क प्रॉडक्ट्स आणि शिवामृत मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथेही निकृष्ट दर्जाचे दूध आणि अस्वच्छ साठवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात दूध जप्त करण्यात आले.

याशिवाय, राज्यातील ५८ हॉटेलांची तपासणी करण्यात आली असून २६ हॉटेलांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे, तर ४ हॉटेलांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

Greece : विमानाच्या खिडकीची काच फुटली अन् प्रवासी बाहेर खेचला गेला; सीटबेल्टने वाचवला जीव

Tukaram Mundhe, FDA Maharashtra, Rustam Ice Cream, Mumbai Ice Cream Shop, Food Safety Maharashtra, FDA Raid Mumbai, Ice Cream Parlour Raid, Milk Adulteration, FSSAI Rules, Mumbai News

आपलं सरकार

Click to listen highlighted text!