Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिक्षक आंदोलनात सहभागी 8,600 शिक्षकांवर कारवाईची तयारी; एका दिवसाचा पगार कापणार, शिक्षण विभागाचे आदेश

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या शिक्षकांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो शिक्षकांवर शिक्षण विभागाने कारवाईची तयारी सुरू केली आहे. विभागाच्या माहितीनुसार आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे 8,600 शिक्षकांचा एका दिवसाचा पगार कापण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Advertisements

9 जुलै रोजी राज्यभर “शाळा बंद” आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मुंबईतील आझाद मैदानासह विविध जिल्ह्यांत शिक्षकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनामुळे राज्यातील 60 टक्क्यांहून अधिक सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये अध्यापनावर परिणाम झाला.

Advertisements
Advertisements

आंदोलनापूर्वीच शिक्षण संचालनालयाने सहभागी शिक्षकांचे वेतन कपात करण्याचा इशारा दिला होता. मात्र, “वेतन कापले तरी माघार नाही” अशी भूमिका घेत शिक्षकांनी आंदोलन कायम ठेवले.

शिक्षक संघटनांच्या दाव्यानुसार आंदोलनात 5 हजारांहून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. मात्र, शालेय शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार हा आकडा 8,600 इतका असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व शिक्षकांची माहिती संकलित करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना देण्यात आले आहेत.

शिक्षकांच्या प्रमुख मागण्या

आंदोलनकर्त्या शिक्षकांनी बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून निवडणूक कामकाजासाठी नियुक्तीला विरोध केला आहे. हे काम शैक्षणिक नसून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा दावा शिक्षकांनी केला.

याशिवाय 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी (TET) माफी, जुने पदोन्नती धोरण लागू करणे, स्टाफिंग नॉर्म्समध्ये सुधारणा आणि प्रशासकीय कामाचा ताण कमी करण्याच्या मागण्याही करण्यात आल्या. या आंदोलनाला विरोधी पक्षातील काही नेत्यांनीही पाठिंबा दर्शवला.

मुंबईच्या प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीम पार्लरवर FDA ची धाड; परवाना निलंबित ९ लाखांचा माल जप्त

शिक्षक आंदोलन, शिक्षकांचा पगार कापणार, महाराष्ट्र शिक्षक आंदोलन, आझाद मैदान शिक्षक आंदोलन, Teacher Salary Cut Maharashtra, BLO Duty Protest, TET माफी, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शिक्षण बातम्या, Government Teachers Maharashtra

आपलं सरकार

Click to listen highlighted text!