आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी…

दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाचा तपास पुढे सरकत असल्याने आदित्य ठाकरे यांच्या अडचणी येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटीची चौकशी करणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आलेल्या या वृत्तामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने जवळपास तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याच्या काही दिवस आधीच दिशा सालियानचा देखील मृत्यू झाला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी सातत्याने या दोन्ही प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले होते. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे.
या प्रकरणाविषयी आता एसआयटी चौकशी देखील होण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांनी आदित्या ठाकरेंना लवकरच अटक होणार असून अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे परदेशात पळून जाणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज एसआयटी चौकशी आणि आदित्य ठाकरे दुबईत यानंतर पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
दम्यान, आदित्य ठाकरे हे दुबईत एका परिषदेसाठी गेले आहेत. संयुक्त राष्ट्रांची वार्षिक जागतिक हवामान परिषद दुबईत सुरू असून या परिषदेसाठी आदित्य ठाकरे दुबईला गेले असून बुधवारी आदित्य ठाकरे या परिषदेस उपस्थित होते. विविध चर्चा सत्रांदरम्यान महाराष्ट्राचा माजी पर्यावरण मंत्री आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. तसेच ह्यावेळी ROOH च्या अभ्यासपूर्ण सत्रामध्ये देखील ते सहभागी झाले. सत्रामध्ये गरजूंना पर्यावरणपूरक घरे कशी देता येतील, या विषयी देखील चर्चा करण्यात आली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ठाकरे कुटुंबीयांवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. सुशांत सिंह आणि दिशा सालियन केसमध्ये आदित्य ठाकरे लवकरच जेलमध्ये जातील असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. तसेच त्यांच्यासोबत संजय राऊतही जेलमध्ये जातील असेही ते म्हणाले.
MarathaReservationUpdate : मराठा आरक्षण क्युरेटिव्ह याचिकेवरील सुनावणी पूर्ण
महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
For News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765