महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी ‘एसीपी’ला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद येथील सहाय्यक पोलीस आयुक्त असलेल्या विशाल ढुमे यांच्यावर महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी आज त्यांना अटक करुन, न्यायालयात हजर केले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात अली आहे.
विशाल ढुमे यांनी आपल्याच एका मित्राच्या पत्नीची छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर रविवारी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर सिटी चौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज सकाळी त्यांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रविवारी पीडित महिला आपल्या पती आणि लहान मुलीसह शहरातील सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होते. याचवेळी तिथे तिच्या पतीच्या ओळखीचे विशाल ढुमे तिथे आले. दरम्यान महिला आणि तिच्या पतीचे जेवण झाल्यावर ते निघत असताना, विशाल ढुमे आणि तिच्या पतीची भेट झाली. तसेच आपण गाडी आणली नसल्याने आपल्याला घरी सोडण्याची विनंती ढुमे यांनी महिलेच्या पतीला केली. ओळखीचे असल्याने महिलेच्या पतीने देखील होकार दिला. मात्र गाडीत बसताच पुढच्या सीटवर बसलेल्या पीडित महिलेच्या मागे बसलेल्या विशाल ढुमे यांनी छेड काढायला सुरवात केली. त्यामुळे महिला प्रचंड घाबरली. घर येताच गाडीतून उतरून महिला आपल्या घरात गेली. दरम्यान विशाल ढुमे यांना घरी सोडण्यासाठी महिलेचा पती गाडीत बसले असतानाच, विशाल ढुमे यांनी मला तुमच्या बेडरूममधील वॉशरुममध्ये जाण्याचा हट्ट सुरु केला. यावेळी समजून सांगत असताना देखील विशाल ढुमे ऐकायला तयार नव्हते. तब्बल दीड तास विशाल ढुमे यांचा पीडित महिलेच्या घरासमोर गोंधळ सुरु होता. त्यामुळे अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी त्यांना तिथून घेऊन गेल्याने अखेर ढुमे यांचा गोंधळ बंद झाला, असे पीडित महिलेने सांगितले आहे.
राज्यातील शिक्षक – पदवीधर विधानपरिषदेच्या उमेदवारीचे चित्र स्पष्ट
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#Aurangabad #AurangabadNews #NewsUpdate #Currentnewsupdate #NewsUpdate #MahanayakNews #MahanayakOnline