AurangabadNewsUpdate : विनयभंग प्रकरणी एसीपी घुमे यांना २५ हजाराच्या जातमुचलक्यावर नियमीत जामीन

औरंगाबाद : मित्राच्या पत्नीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात औरंगाबादचे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे पाटील यांची तुरुंगात रवानगी केल्यानंतर न्यायालयात करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना २५ हजाराच्या जातमुलक्यावर जामीन मंजूर केला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान पोलीस आयुक्तांनी तब्बल १४ तासांच्या चौकशीनंतर पुढील कार्यवाहीसाठी गृहविभागाकडे अहवाल पाठवला आहे आता गृहविभाग या प्रकरणात काय कारवाई करणार? याकडे औरंगाबाद पोलीसांचे लक्ष लागले आहे.
गाडी नाही मला घरी सोडा असे सांगून मित्राच्या गाडीत बसून त्याच्याच पत्नीचा विनयभंग करून दोन तास दादागिरी करत धिंगाणा घालणा-या सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल ढुमेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणाचा पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी तब्बल चौदा तास तपास करून या प्रकरणाचा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी माध्यमांना दिली.
सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांनी एमआयडीसी सिडको हद्दीतील एका हॉटेलमध्ये भेटलेल्या मित्राला गाडी नाही मला घरी सोडा असे सांगुन त्याच्या गाडीत बसून त्याचाच पत्नीचा विनयभंग करून नारळीबाग येथील निवासस्थानी जावून धिंगाणा करत शिवीगाळ आणि मारहाण केली. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांच्याकडे दिला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अनेकांचे जवाब,सीसीटीव्ही फुटेज व अन्य माहिती मिळविण्यासाठी तब्बल चौदा तास तपास करून त्याचा अहवाल पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी पोलिस महासंचालकांकडे पाठविला आहे. याप्रकरणी हॉटेलचे वेटर, 112 पोलिस पथकातील कर्मचार्यांचे जवाब व घटनास्थळावरील सर्वांचे जवाब व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी गोळा केले आहेत.
पोलिस मुख्यालयी न थांबता ढुमे नारळीबागेत
सिडकोतील हॉटेलमधून निघाल्यानंतर एसीपी विशाल ढुमे मित्राच्या कारमध्ये बसला. मित्राने कार पोलिस आयुक्तालासमोर उभी केली असता, ढुमे यांनी कारमधून उतरण्यास नकार दिला. तुझ्या बायकोला घरी सोडून आपण कॉफी घेऊ असे सांगून ढुमे नारळीबागेत आला. त्यानंतर ढुमेनी धिंगाणा घातल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आल्याचे निष्पण झाले.
क्राईम एसीपीचा पदभार कुणाकडे?
पोलिस आयुक्तालयात 8 एसीपींची पदे असतांना आयुक्तालयात केवळ चारच सहाय्यक पोलिस आयुक्त आहेत. ढुमेंववर गुन्हा दाखल होताच पोलिस आयुक्तांनी ढुमे यांच्यावर कारवाई करत त्यांचा पदभार काढून घेत त्यांना नियंत्रण कक्षाचा पदभार दिला होता. त्यामुळे गुन्हेशाखेचा सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार कुणाला मिळणार याकडे विभागाचे लक्ष लागले आहे.
महिलेचा विनयभंग करणा-या एसीपी ढुमेंना नियमीत जामीन मंजूर
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाला ढुमेंना आज सकाळी सिटीचौक पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानंतर ढुमेंनी नियमीत जामीनीसाठी अर्ज सादर केला, अर्जावरील सुनावणीवेळी आरोपी हे वरिष्ठ अधिकारी असून ते तपासात अडथळा निर्माण करु शकतात. घटनास्थळावरुन सीसीटीव्ही चित्रण जप्त करण्यात आले असून आरोपीने महिलेचा विनयभंग करुन त्यांच्या पतीसह इतर नातेवाईकांना देखील मारहाण केल्याने आरोपीला जामीन देण्यात येवू नये अशी विनंती सहायक सरकारी वकील शशिकांत इघारे यांनी केली. तर ढुमेंच्या वतीने अॅड. गोपाल पांडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आर्णेश कुमार प्रकरणाच्या खटल्याचा हवालादेत आरोपी विशाल ढुमे हे पोलीस अधिकारी असल्याने ते पसार होण्याची शक्यता नाही.
दरम्यान या गुन्ह्याखाली त्यांना जास्तीजास्त सात वर्षे किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा आहे. तसेच कोर्टाला जामीन देण्याचा आधिकार असल्याचा युक्तीवाद केला. सुनावणीअंती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी. बेदरकर यांनी अखेर 25 हजारांच्या जात मुचलक्यावर ढुमेंचा नियमीत जामीन अर्ज मंजूर केला. प्रकरणात अॅड. पांडे यांना अॅड. किरण कुलकर्णी, अॅड. पवन राऊत, अॅड. रुपा साखला यांनी सहकार्य केले.