Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लातूर | भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विश्वजीत गायकवाड

Advertisements
Advertisements
Spread the love

लातूर, (अरुण जे कांबळे) : भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. उच्च शिक्षण, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी यामुळे ते प्रभावी नेतृत्व देऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Advertisements

ही नियुक्ती केवळ पदभरती नसून समाजातील वंचित, शोषित आणि मागासघटकांच्या सशक्तीकरणासाठी पक्षाने दाखवलेला विश्वास असल्याचे मत कार्यकर्त्यांनी मांडले. विश्वजीत गायकवाड यांनी आतापर्यंत विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला असून तळागाळातील प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.

Advertisements
Advertisements

त्यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती मोर्चा अधिक सक्षम, प्रभावी आणि जनतेच्या प्रश्नांवर निर्णायक भूमिका घेणारा बनेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. समाजहित, समरसता आणि सर्वांगीण विकास या त्रिसूत्रीवर काम करत ते राज्यभर संघटना मजबूत करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, लातूर शहरातील प्रकाश नगर परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. विश्वजीत गायकवाड यांना नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या आगामी वाटचालीसाठी सर्व स्तरांतून पाठिंबा व्यक्त केला जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!