Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कॉक्सिट येथे स्टार्ट-अप ऑफ कॉक्सिट २०२६ स्पर्धेचे यशस्वी आयोजन

Advertisements
Advertisements
Spread the love

लातूर (अरुण जे कांबळे): येथील कॉक्सिट महाविद्यालयात व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या वतीने रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. एम. आर. पाटील व उपाध्यक्ष एल. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टार्ट-अप ऑफ कॉक्सिट- २०२६ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ लातूर उपकेंद्राचे परीक्षक दिलीपकुमार बोईनवाड यांच्या हस्ते झाले.

Advertisements

अध्यक्षस्थानी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. आर. एस. अवस्थी होते. यावेळी रेणापूरच्या शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. पी. टी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कॉक्सिटचे उपप्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, तज्ज्ञ संचालक एन. डी. जगताप, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. कैलास जाधव, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. डी. एच. महामुनी, व्यवस्थापनशास्त्र विभागप्रमुख डॉ. राहुल डोंबे, समन्वयक गोरोबा माने, सहसमन्वयक प्रा. वैष्णवी चव्हाण यांची उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements

यावेळी डॉ. दिलीपकुमार बोईनवाड म्हणाले, नवतरुण उद्योजकांनी उद्योजकीय कौशल्य, नवोपक्रमशीलता आणि प्रत्यक्ष बाजारातील अनुभव यांचा समन्वय साधून उद्योगक्षेत्रात पुढे यावे, असे सांगितले.

डॉ. पी. टी. पवार यांनी आधुनिक युगातील विविध समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी तरुणांनी आपल्या कल्पकतेचा प्रभावी उपयोग करून उद्योगविश्वात धाडसाने पाऊल टाकावे, असे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. आर. एस. अवस्थी यांनी विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. उद्योग क्षेत्रातील अनुभवातून आवश्यक बारकावे आत्मसात करून तरुणांनी यशस्वी उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे त्यांनी नमूद केले.

या स्पर्धेत एकूण २९ संघांनी सहभाग नोंदविला. यात बीबीए तृतीय वर्षाचा विद्यार्थी विश्वम लिंबुटे, बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी तृतीय वर्षाची विद्यार्थिनी राधिका शिवनगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. बीसीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी राधेय खंडेलवाल यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. बीबीए प्रथम वर्षाची श्रेया बडगिरे हिने तृतीय क्रमांक संपादन केला.

सूत्रसंचालन डॉ. शिवेश्वर मुचाटे आणि डॉ. योगेंद्र कांबळे यांनी केले. आभार जी. बी. माने यांनी केले. यशस्वीतेसाठी व्यवस्थापनशास्त्र विभागातील डॉ. सोमेश्वर पंचाक्षरी, थोरात, जिजाबाई शिंदे, फारुख शेख, गणेश गवळी, शिक्षक, कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!