Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महात्मा बसवेश्वरच्या विद्यार्थ्यांची जेईई मेन्समध्ये उल्लेखनीय कामगिरी

Advertisements
Advertisements
Spread the love

लातूर, (अरुण जे कांबळे) : महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर व्दारा संचलित महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थी ठाकूर दत्ता दिगंबरसिंग (95.07 पर्सेंटाइल), दीक्षित वारद वसंत (89.51 पर्सेंटाइल), शिंदे वेदांत वसंत (88.46 पर्सेंटाइल) आणि जाजे वैष्णवी शिवकुमार (81.47 पर्सेंटाइल) यांनी जेईई मेन्स (पहिले सत्र) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

Advertisements

हे सर्व विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आमच्या महाविद्यालयात घेण्यात आलेल्या नियमित तासिका, नियमित सराव परीक्षा आणि त्यातील अडचणी व उपाय योजना, संस्था पदाधिकारी, आई-वडील, प्रभारी प्राचार्य, मुख्य समन्वयक, पर्यवेक्षक, सीईटी सेल मुख्य समन्वयक, बोर्ड समन्वयक आणि विज्ञान शाखेचे सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनामूळे हे उज्ज्वल यश प्राप्त झाले आहे अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Advertisements
Advertisements

त्यांनी मिळविलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, उपाध्यक्ष माधवराव पाटील तपसेचिंचोलीकर, सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीपकुमार दिंडेगावे आणि इतर सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. आनंद शेवाळे, मुख्य समन्वयक डॉ. भास्कर रेड्डी नल्ला, पर्यवेक्षक प्रा. नितीन वाणी, सीईटी मुख्य समन्वयक प्रा. वनिता पाटील, बोर्ड समन्वयक डॉ. गुणवंत बिरादार, स्टाफ सचिव, विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!