Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवजयंती उत्साहात साजरी; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते शिवरायांना अभिवादन

Advertisements
Advertisements
Spread the love

लातूर, (अरुण जे कांबळे) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लातूर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Advertisements

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे तसेच तहसीलदार सौदागर तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements

यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहिताचे कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!