Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून १४ उमेदवार निवडणूक रिंगणात …

Spread the love

औरंगाबाद  : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला असून 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.


१. काळे विक्रम वसंतराव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, २. प्रा.पाटील किरण नारायणराव – भारतीय जनता पार्टी, ३. माने कालीदास शामराव – वंचित बहुजन आघाडी, ४. अनिकेत भीमराव वाघचवरे पाटील – अपक्ष, ५ . प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (के.सागर) – अपक्ष, ६ . आशिष (आण्णा) आशोक देशमुख – अपक्ष, ७ . कादरी शाहेद अब्दुल गफुर – अपक्ष, ८ . नितीन रामराव कुलकर्णी – अपक्ष, ९. प्रदीप दादा सोळुंके – अपक्ष, १०. मनोज शिवाजीराव पाटील – अपक्ष, ११. विशाल (विक्की) उद्धव नांदरकर – अपक्ष,१२. सूर्यकांत संग्राम विश्वासराव – अपक्ष, १३. संजय विठ्ठलराव तायडे – अपक्ष, १४. ज्ञानोबा चिमनाजी डुकरे – अपक्ष असे एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर डॉ.गणेश वीरभद्र शेटकर – अपक्ष या एका उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून शेखर चन्ने (भा.प्र.से.) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक – 8956710497 तर दुरध्वनी क्रमांक – 0240-299801 असा आहे.

मतदान 30 जानेवारीला तर मतमोजणी 2 फेब्रुवारीला

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुक लढविणाऱ्या उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत आज झाली.औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी रोजी व मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

या निवडणूक प्रक्रियेबाबत उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी ही बैठक झाली. उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींसह निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदिश मिनियार उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम, नियमावली, मतदान, मतमोजणी, तारखा व वेळा, मतदार यादी, प्रचार साहित्य छपाई निर्बंध, मतदान केंद्रे, उमेदवार तसेच प्रतिनिधीचे ओळखपत्र, निवडणूक आयोगाचे निर्देश, आदींबाबत श्री.केंद्रेकर यांनी माहिती दिली.

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. माहितीसाठी मार्गदर्शिकेचेही वितरण यावेळी करण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!