Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यातील शिक्षक – पदवीधर विधानपरिषदेच्या उमेदवारीचे चित्र स्पष्ट

Spread the love

राज्यातील शिक्षक – पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकांमधील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज (१६ जानेवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावतीत या पाचही मतदार सांगत सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मात्र पाचही मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा स्वतःचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा नाही.

नाशिक पदवीधर मतदारसंघ

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमोल बाळासाहेब खाडे, डॉ.सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब हिरामण पवार, धंजनय क्रिष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनराज देविदास विसपुते या ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. भाजपचे समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतल्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील विरुद्ध सुभाष जंगले अशी थेट लढत होणार आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघ

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज १० उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. भाजपचे उमेदवार डॉ रणजीत पाटील आणि माविआचे धीरज लिंगाडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघ

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी ५ उमेदवारांनी आजआपला अर्ज मागे घेतला आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे चार उमेदवार म्हणजे नागो गाणार (भाजपचा पाठिंबा), सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे, सतीश इटकेलवार.

 

कोकण शिक्षक मतदारसंघ

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत एकूण ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. म्हात्रे ज्ञानेश्वर बारकु (भारतीय जनता पार्टी) , धनाजी नानासाहेब पाटील (जनता दल (युनायटेड )), उस्मान इब्राहिम रोहेकर (अपक्ष), तुषार वसंतराव भालेराव (अपक्ष) देवरुखकर रमेश नामदेव (अपक्ष) बाळाराम दत्तात्रेय पाटील (अपक्ष) , प्रा.सोनवणे राजेश संभाजी (अपक्ष), संतोष मोतीराम डामसे (अपक्ष) असे आहेत. त्यापैकी या ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत ; कडू वेणुनाथ विष्णु, घोन्साल्वीस जिमी मतेस, बळीराम परशुराम म्हात्रे, बाळाराम गणपत पाटील, ज्ञानेश्वर पुंडलिक म्हात्रे. वेणूनाथ यांच्या माघारीमुळे भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा मार्ग सुकर झाला आहे पण मविआचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या मार्गात अडचणी आल्या आहेत.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत एकुण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १ उमेदवाराने उमेदवारी मागे घेतली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे वक्तासेलचे प्रमुख प्रदीप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तसेच भाजपचे नितीन कुलकर्णी देखील रिंगणात आहेत.

एकुण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात :

आ. विक्रम काळे – राष्ट्रवादी काँग्रेस, प्रा. किरण पाटील – भाजप, वंचित बहुजन आघाडीकडून कालिदास माने यांनी, तर प्रदीप साेळुंके, सूर्यकांत विश्वासराव, मनोज पाटील, संजय तायडे, कादरी शाहेद अब्दुल गफूर, अनिकेत वाघचौरे, नितीन कुलकर्णी, विशाल नांदरकर, प्रा. अश्विनकुमार क्षीरसागर, आशिष देशमुख, ज्ञानोबा डुकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

पाच मतदारसंघात सध्या कोण आहेत आमदार?

  • नाशिक पदवीधर मतदारसंघात सध्या काँग्रेसचे सुधीर तांबे हे आमदार आहेत.

  • अमरावती पदवीधर मतदारसंघात सध्या भाजपचे रणजित पाटील हे आमदार आहेत.

  • नागपूर शिक्षक मतदारसंघात सध्या अपक्ष नागो गाणार हे आमदार आहेत.

  • कोकण शिक्षक मतदारसंघात सध्या शेकापचे बाळाराम पाटील हे आमदार आहेत.

  • औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे हे आमदार आहेत

 

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी


#Maharashtra #MaharashtraElectionUpdate #Constituency #PoliticalUpdate #Politicalnews#Mahanayak #MahanayakOnline #MahanayakNews #Nashik #Aurangabad #kokan #Amravati #Nagpur

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!