Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट, मोठी दुर्घटना टळली

Spread the love

पुण्यातील एका कार्यक्रमात दीप प्रज्वलन नंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. साडीने पेट घेतल्याचे वेळीच लक्षात आल्याने ही आग विझवण्यात आली असून सुदैवाने यावेळी खासदार सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही.

हिंजवडी परिसरातील एका कराटे कोचिंग क्लासेस आज उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सुळे यांनी दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मात्र महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना सुप्रिया दिव्यामुळे त्यांच्या साडीने पेट घेतला. अचानक लागलेली ही आग कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने वेळीच विझवण्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या घटनेनंतरही सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमातून निघून न जाता तिथेच थांबल्या असून, खासदार सुप्रिया सुळे यांचे दिवसभरातील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

नितीन गडकरींना दाऊद इब्राहिमच्या नावे, जीवे मारण्याची धमकी

#supriyasule #Pune #MahanayakOnline #MahanyakNews #NewsUpdate #News #CurrentNews #Currentnewsupdate

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!