राधाकृष्ण विखे पाटील असणार भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा – प्रकाश आबंडेकर

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मोठी खेळी सूरू असून राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आबंडेकर यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलतांना केला आहे. दरम्यान त्यांनी ठाकरे गटाशी होणाऱ्या युतीबाबतही भाष्य केले आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याच्या प्रयत्नात आहे. मी जे बोलतो आहे, ते देवेंद्र फडणवीसांना आवडणार नाही, पण राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकतात, तसेच नगरमध्येही राजकारण सुरू असून बाळासाहेब थोरतही मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहेत,अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाशी होणाऱ्या युतीबाबतही ते म्हणाले, आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आम्ही सोबत लढणार आहोत. त्यासाठी जागा वाटपही निश्चित झाले आहे. तसेच आमची युती २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही कायम राहणार आहे. या युतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असतील का? याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील. असे स्पष्ट केले आहे दरम्यान, काँग्रेसवर भरोसा ठेवू नये हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे खोटारडे व्यक्ती आहेत. त्यांनी मला मंत्री बनवण्याचे आश्वासन दिले होते.असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राज्यातील शिक्षक – पदवीधर विधानपरिषदेच्या उमेदवारीचे चित्र स्पष्ट
महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी ‘एसीपी’ला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055