#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
Jan. 2023
Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
28. Jan. 2023 – Saturday
#MahanayakNews | गल्ली ते दिल्ली | Current News Update
-
मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्याजवळ सुखोई-३० आणि मिराज -२००० विमाने कोसळली आहेत. परिसरात शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
मध्य प्रदेश के मुरैना के पास सुखोई-30 और मिराज 2000 विमान दुर्घटना में रक्षा मंत्री राजनाथ सिंह CDS जनरल अनिल चौहान और वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल वीआर चौधरी के संपर्क में हैं और उनसे घटना की जानकारी ले रहे हैं: रक्षा सूत्र pic.twitter.com/IBYJXztl5G
— ANI_HindiNews (@AHindinews) January 28, 2023
-
राजस्थान: भरतपूरमध्ये जेटचे अवशेष दिसले. भरतपूरचे जिल्हा दंडाधिकारी आलोक रंजन यांनी चार्टर जेटच्या आधीच्या अहवालाला दुजोरा दिला होता. दरम्यान, डीएसपी अजय शर्मा यांनी म्हणाले कि, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आम्हाला विमान क्रॅश झाल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी आल्यानंतर हे हवाई दलाचे लढाऊ विमान असल्याचे आढळून आले. ते कोणत्या श्रेणीतील लढाऊ आहेत हे माहीत नाही. पायलटबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाहीः (अजय शर्मा, डीएसपी भरतपूर, राजस्थान)
#WATCH राजस्थान: भरतपुर में जेट का मलबा देखा गया। भरतपुर के जिला अधिकारी आलोक रंजन ने पहले की रिपोर्ट की चार्टर जेट की पुष्टि की थी। रक्षा सूत्रों ने पुष्टि की है कि भारतीय वायुसेना के जेट आसपास के क्षेत्र में दुर्घटनाग्रस्त हो गए हैं। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/bmg9i7icB7
— ANI_HindiNews (@AHindinews) January 28, 2023
-
आज आणि उद्या (28 आणि 29 जानेवारी) राज्यात मध्य महाराष्ट्रातील १० आणि मराठवाड्यातील सात अशा १७ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
-
युनायटेड स्टेट्सच्या राजकीय घडामोडींचे अवर सचिव व्हिक्टोरिया नुलँड २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत नेपाळ, भारत, श्रीलंका आणि कतारला जाणार आहेत.
-
चार धाम यात्रेची तयारी सुरू झाली आहे. केदारनाथ धामचे दरवाजे २६ एप्रिलला आणि गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे २२ एप्रिलला उघडतील. यापूर्वी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख २७ एप्रिल निश्चित करण्यात आली होती.
-
बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील जगदीशपूर पोलीस स्टेशन हद्दीतील घघा गावात अवैध दारू विक्री सुरु असल्याच्या माहिती मिळताच शुक्रवारी सायंकाळी उशिरा छापा टाकण्यासाठी गेलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस पथकावर अवैध दारू तस्करांनी हल्ला केला. या हल्ल्यात अकरा पोलीस जखमी झाले असून, गावकऱ्यांनी चार दारू तस्करांची पोलिसांच्या तावडीतून सुटका केली.
-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानमधील जालोर येथे एका कार्यक्रमात सांगितले की, आपला सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे. आपला देश सुरक्षित राहावा, आपले महान स्थळ पुनर्संचयित केले जावे, आपल्या धार्मिक स्थळांची कोणत्याही काळात विटंबना (अपवित्र) झाले असेल, तर त्यांच्या जीर्णोद्धारासाठी मोहीम राबवली पाहिजे.
-
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला काश्मीरमधील अवंतीपोरा येथून सुरुवात झाली आहे. पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्तीही त्यांच्या यात्रेत सामील झाल्या आहेत.
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
.
.
.
.
24. Jan. 2023 – Tuesday
#MahanayakNews | गल्ली टे दिल्ली | Current News Update
-
उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त सामील झाली.
जब साथ आ जाते हैं सितारे
कुछ और दमक उठती है यात्रा!मशहूर अभिनेत्री @UrmilaMatondkar ने यात्रा में शामिल हो कर दीं अपनी शुभकामनाएं।#BharatJodoYatra pic.twitter.com/ztswuawVNX
— Bharat Jodo Nyay Yatra (@bharatjodo) January 24, 2023
-
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री घोषणा देत म्हणाले, सुभाषचंद्र बोस यांनी नारा दिला होता की, तुम मुझे खून दो में तुम्हे आज़ादी दूंगा. मी आज एक नारा देतो… “तुम मेरा साथ दो मैं भारत को हिन्दूराष्ट्र बनाऊंगा” आज आम्ही घोषित करतो की भारत हिंदू राष्ट्र आहे. आता बांगड्या घालून घरी बसू नका.
-
जम्मू-काश्मीर: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आज जम्मूच्या नगरोटा येथून सुरुवात झाली.
-
दिल्ली महापौर निवडणूक : नामनिर्देशित नगरसेवकांच्या शपथविधीवेळी भाजपने लावला जय श्री रामचा नारा
-
पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाडला चुनाभट्टी पोलिसांकडून अटक. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक झाली.
-
टोरंट कंपनीने हिस्सा न दिल्याच्या निषेधार्थ पुण्यात २७ जानेवारीपासून सीएनजी पंप चालकांकडून संपाचा इशारा
-
धुळे महानगरपालिकेतील 160 बदली सफाई कामगारांचे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात
-
औरंगाबाद : न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील विद्युत खांबावरील अनधिकृत १० हजार मीटर वायर मनपाने काढले.
-
पुणे : भीमा नदी पात्रात आढळले चार मृतदेह
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
.
.
.
.
23. Jan. 2023 – Monday
#MahanayakNews | गल्ली टे दिल्ली | Current News Update
-
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांना येत असलेल्या धमकीच्या पार्शवभूमीवर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
-
नागपुर येथील पोलिस आयुक्त कार्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावरील लेखा विभागाला आग
-
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीची उद्धव ठाकरेंकडून घोषणा
-
मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपलास फाट्याजवळ भरधाव ट्रकची पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक, दोन जण जखमी
-
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेत्यांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
-
बीडच्या नारायण गडावर मुक्कामी असलेल्या पैठण आगारातील एका एसटी बस मधून दोनशे लिटर डिझेलची अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे
-
अंबरनाथ पूर्वेतील अनेक सार्वजनिक शौचालयांमध्ये दरवाजे नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत स्थानिकांना विचारलं असता पालिकेने दोन वेळा दरवाजे बसवले, मात्र हे दरवाजे वारंवार कोणीतरी चोरून नेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
-
पुणे : कसब्यात काँग्रेसची महत्वाची बैठक, पोटनिवडणुकीसाठी लवकरच नाव होणार फायनल
-
औरंगाबाद : नाथसागर धरणावरील पुलाला कठडा नसल्याने नियंत्रण सुटलेली एक कार थेट धरणाच्या पाण्यात कोसळली. उपस्थितांनी कारमधील तिघांना काचा फोडून बाहेर काढले.
-
कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसंबंधी मला नाही, त्यासंबंधी तुम्ही अजित पवार यांना विचारा : शरद पवार
-
देवघर येथे आपे रिक्षाला अपघात ‘ हळदीकुंकू कार्यक्र्मवरून परतणाऱ्या ९ महिला जखमी ; दोन गंभीर
-
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बारामतीत…कार्यक्रमाला लावणार उपस्थिती..
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
.
.
.
.
21. Jan. 2023 – Saturday
#MahanayakNews | गल्ली टे दिल्ली | Current News Update
-
औरंगाबाद: अहमदनगर महामर्गवरील नगरनका येथे धावत्या ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे.
-
औरंगाबादः महिला सरपंचाच विनयभंग करून चाकू हल्ला; चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
-
सांगलीचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग भगत लडाखमध्ये शहीद; लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार
-
शरद पवार एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर, पुण्यातील कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष
-
लोढा मंत्री यांच्या कंपनीकडून घर घेणाऱ्या नागरिकांची कोट्यावधींची फसवणूक
-
लोकसभेची जागा आमचीच अब्दुल सत्तार यांचा दावा.
-
पुण्यातला धक्कादायक प्रकार. बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला पेटवल.
.
.
.
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
20. Jan. 2023 – Friday
#MahanayakNews | गल्ली टे दिल्ली | Current News Update
-
वेणूगोपाळ धूत यांनाही उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन, धूत यांच्याकडून सीबीआयने बेकायदेशीरपणे अटक केल्याचा आरोप
-
भारत जोडो यात्रा आपल्या प्रवासाच्या १२५ व्या दिवशी जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथून पुन्हा सुरू झाली;
#WATCH | Bharat Jodo Yatra resumes from Kathua in Jammu & Kashmir on the 125th day of its journey; sees the participation of Shiv Sena (Uddhav Thackeray) leader Sanjay Raut today pic.twitter.com/Ve81omvQ5m
— ANI (@ANI) January 20, 2023
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या रिंग सेरेमनीमध्ये अंबानी कुटुंबाचा डान्स
#WATCH | The Ambani family dances at the ring ceremony of Anant Ambani and Radhika Merchant
The engagement ceremony was held at Mukesh Ambani's Mumbai residence 'Antilla' yesterday pic.twitter.com/mmNsI9fzkc
— ANI (@ANI) January 20, 2023
-
औरंगाबादमधील लाडसावंगी, खुलताबाद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर वेळेवर न आल्याने, शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या १०७ महिलांना चोवीस तासाचा उपवास घडल्यामुळे अनेक महिलांची तब्येत बिघडली.
-
मंत्रालयातील प्रवेशासाठी देण्यात येणारी पास सेवा ठप्प झाली आहे. पाच महिन्यांपासून या कंत्राटी कामगारांचा पगार न झाल्याने संप पुकारण्यात आले आहे. पास सेवा ठप्प झाल्याने मंत्रालयात प्रवेश करायचा कसा असा सर्वसामान्यांच्या पुढे प्रश्न आहे.
-
जम्मू –संजय राऊत राहुल गांधी सोबत आज भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे
-
१७ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांकडून आपापली बाजू मांडण्यात आली. त्यानंतर आजची तारीख देण्यात आली होती. आज शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण कुणाचे? निवडण्याक अयोग्य घेणार निर्णय.
-
क्रॉस मैदानावर ‘काळा घोडा’ महोत्सव; व्यावसायिक आणि खानपान स्टॉलला मात्र मनाई
-
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
.
.
.
.
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
17. Jan. 2023 – Tuesday
#MahanayakNews | गल्ली टे दिल्ली | Current News Update
-
शिवसेना पक्षनाव आणि धनु्ष्यबाण चिन्हाबाबत आज दुपारी ४ वाजता निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे. यासाठी दोन्ही गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
-
धावत्या पीएमपी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एकाला कोथरुड पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
लातूरच्या मुरुडमध्ये भीषण बस अपघात झाला आहे. या अपघातात ४० जण जखमी झाले असून त्यापैकी १४ गंभीर आहेत. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
-
नाशिक : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अडचणीत; तहसीलदारांनी बजावली नोटीस
-
शाहीर आदिनाथ विभूते यांचे निधन
-
बाळासाहेबांना डावलून यांना महाराष्ट्रात राजकारण करताच येणार नाही…सुप्रिया सुळे यांनी दौंडमध्ये लगावला टोला
-
अखेर शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांचे जावई,प्रसिध्द क्रिकेटर विजय झोल यांच्यावर गुन्हा दाखल
-
औरंगाबाद – बेपत्ता असलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा मृतदेह विहिरीत आढळल्याने उडाली खळबळ.तीन दिवसापासून सुरू होता शोध. कन्नड तालुक्यातील घटना स्वती चव्हाण व शीतल चव्हाण अशी मृत बहिणींची नावे आहे.
-
ठाणे – रुग्णालयाच्या मागे पाण्याच्या टाकीत आढळला अज्ञात मृतदेह.
-
परभणी – सेलू शहरातून 29 वर्षीय युवक बेपत्ता
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
.
.
.
.
16. Jan. 2023 – Monday
#MahanayakNews | गल्ली टे दिल्ली | Current News Update
-
बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांची आजची ईडी चौकशी संपली
-
जालना : पिंपळगाव रेणुकाई येथे एका घरात खोदकाम करताना सोने निघाल्याची चर्चा
-
उस्मानाबादमध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
-
नाशिक : पदवीधर निवडणुकीत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस
-
परळीतील डॉक्टरांची दोन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपीला बीड पोलिसांनी गुजरात येथून अटक केली असून १२ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
-
औंढा नागनाथ परभणी रोडवर आपघात; टाटा मॅजिकच्या अपघातात दोघेजण जागीच ठार तर सहा जण गंभीर
-
चंद्रपूर : बनावट नोटा देण्याचं आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना अटक
-
राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या राज्यातील १० हजारांच्या वर आरोग्य अधिकाऱयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज कामबंद आंदोलन पुकारलं असून जय सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा
-
पुण्यात आजपासून जी-20 परिषद; नारायण राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#gallitedili #CurrentNewsUpdate #MahanayakNews #MahanayakOnline #Maharashtranews #NewsUpdates #Highlights
.
.
.
14. Jan. 2023 – Saturday
#MahanayakNews | गल्ली टे दिल्ली | Current News Update
-
कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये आग लागली आहे. संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी पडली आहे.
-
महाबळेश्वर येथे ३८ मजुरांना घेवुन निघालेल्या टेंपोला भिषण अपघात, जखमींवर महाबळेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील मजुरांचा समावेश असल्याची माहिती आहे.
-
नांदेड – रेड्यांच्या टकरीवर बंदी असताना नांदेडच्या मुदखेड तालुक्यात भरली रेड्यांच्या स्पर्धा
-
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गजानन बेजंकीवार यांचा राजीनामा
-
पुण्याचे नाव जिजाऊ नगर करा राष्ट्रवादीची, संभाजी ब्रिगेडची मागणी तर हिंदू महासंघाचा विरोध
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर
-
शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि ठाकरे गटाच्या माजी आमदारांमध्ये तासभर चर्चा
-
पुणे – महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी आज अंतिम दंगल, माती विभाग आणि गादी विभागातील विजेते भिडणार
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#gallitedili #CurrentNewsUpdate #MahanayakNews #MahanayakOnline #Maharashtranews #NewsUpdates #Highlights
.
.
.
12. Jan. 2023 – Wednesday
#MahanayakNews | गल्ली टे दिल्ली | Current News Update
-
राजमाता जिजाऊ यांचा ४२५ वा जन्मोत्सव
सिंदखेड राजा येथे ४२५ वा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा जिजाऊ स्ष्टीत होणार आहे. सकाळी ६ वाजता महापूजा होणार आहे. सकाळी ७ वाजता दिंडी निघणार आहे. सकाळी ९ वाजता शिवधर्म ध्वजारोहण होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत सास्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
-
आज विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा
-
उझबेकिस्तानमध्ये कथितरित्या भारतीय कफ सिरपच्या सेवनानंतर १९ मुलांचा मृत्यू … भारतीय कंपनी मॅरियन बायोटेकचा कफ सिरप मुलांना देऊ नका, WHO चा इशारा.
-
महापालिका, नगरपालिकांमध्ये विविध ४० हजार पदे भरणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
-
राज्यातील ७५ हजार पदांची नोकर भरती प्रक्रिया १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या जिल्ह्यात टीसीएस आणि आयबीपीएस कंपनींचे सेंटर नाहीत त्याठिकाणी पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअर कॉलेजची मदत घेतली जाणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लवकरच समिती गठीत केली जाणार आहे.
-
पुणे – थंडीचा कडाका राहणार कायम, 8 ते 10 दिवसात हुडहुडी वाढणार हवामान विभागाचा अंदाज
-
नांदेड शहरातील बाफना ओव्हरब्रीजवर सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास काँग्रेस कार्यकर्त्या सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला. या प्रकरणात गायकवाड यांच्या तक्रारीवरून दोघा भावांच्या विरोधात इतवारा पोलिसांनी गुन्हाही नोंद केला होता. परंतु सुरुवातीपासूनच पोलिसांना घटनाक्रमाबाबत संशय होता. दरम्यान पोलीस तपासात सविता गायकवाड या महिलेकडून दोघा भावांना फसविण्यासाठी आपल्या साथीदाराकडून चक्क स्वतःवरच गोळीबार करून घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता फिर्यादीच आरोपी झाली आहे.
-
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर, जळगाव शहरातील विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती राहणार आहे.
-
इंदोर शहरातील मुख्य चौकात राजमाता जिजाऊंचा पुतळा उभारण्यासाठी इंदोर येथील जवळपास ४०० जिजाऊ भक्तांनी सिनखेडराजा येथे येऊन जिजाऊ जन्मस्थळाची पवित्र माती एका कलशात घेऊन ती इंदोर येथे ज्या जागी पुतळा बसवणार आहे. तेथे ठेवण्यासाठी एका कलशात घेऊन जात आहे. ही कलश स्वाभिमान यात्रा असून आज सिनखेडराजा येथून या पवित्र मातीचा कलश घेऊन चारशे जिजाऊ भक्त हे इंदोर येथे पायी जाणार आहेत. त्या ठिकाणी पंचधातूचा भव्य असा जिजाऊंचा पुतळा बसवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ही माती ठेवली जाणार आहे. जिजाऊंच्या ४२५ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने इंदूर महानगरपालिका व जिजाऊ भक्तांच्या संयुक्त विद्यमाने ही कलश यात्रा निघत आहे.
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#gallitedili #CurrentNewsUpdate #MahanayakNews #MahanayakOnline #Maharashtranews #NewsUpdates #Highlights #T
11. Jan. 2023 – Wednesday
-
ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या. लाखाची गोष्ट, गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहित्यांची मंजुळा, बोलाविता धनी, कोर्टाची पायरी अशा अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये चित्रा यांनी नायिका म्हणून काम केलं. त्यांचं लग्नापूर्वीचं नाव कुसुम सुखटणकर होते.
-
थर्मलच्या राखेने घेतला वडगावच्या युवकाचा बळी, जिप आणि कारच्या अपघातात एकजण ठार, १२ जखमी, संतप्त नागरीकांचा रास्ता रोको
-
मराठवाड्यातील साई भक्तांसाठी आनंदाची बातमी. तिरुपती-औरंगाबाद-तिरुपती विशेष गाडीला श्री साईनगर शिर्डी पर्यंत वाढ, वेळापत्रकात बदल
-
नांदेड – काँग्रेस कार्यकर्त्या सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार, दंडाच्या आरपार गेली गोळी, उपचार सुरू
-
माजी आमदार आणि इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे निधन
-
आमदार बच्चू कडू यांचा रस्ता क्रॉस करताना अपघात झाला. उपचारासाठी त्यांना अमरावतीच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात सकाळी ६ ते साडेसहा च्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने धडक दिली. या धडकेत बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांना डोक्याला यांच्या आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे वृत्त आहे.
01. Jan. 2023 – Sunday
#MahanayakNews | गल्ली टे दिल्ली | Current News Update
-
औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाऊसाहेब तरमाळे यांच्या डोक्यात वार, प्रकृती गंभीर, बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
-
पुणे : भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनासाठी राज्यभरातून लाखो भाविकांची गर्दी
-
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
जब साथ आ जाते हैं सितारे
कुछ और दमक उठती है यात्रा!मशहूर अभिनेत्री @UrmilaMatondkar ने यात्रा में शामिल हो कर दीं अपनी शुभकामनाएं।#BharatJodoYatra pic.twitter.com/ztswuawVNX
— Bharat Jodo Nyay Yatra (@bharatjodo) January 24, 2023