अजय सेंगर यांच्या आरोपाला प्रकाश आंबेडकर यांचे प्रत्युत्तर

शौर्यदिनाच्या निमित्ताने पुण्यात हजारो अनुयायी कोरेगाव – भीमा येथील ऐतिहासिक लढाईची आठवण म्हणून अभिवादन करण्यास आले आहेत. यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी विजयस्तंभाला भेट दिली. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणले की, आजचा दिवस सामाजिक आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रतिक आहे. या देशात हजारो वर्ष गुलामी होती. राजकीय गुलामी देखील होती. भीमा कोरेगांवच्या लढाईत ही गुलामी संपली. भारताच्या स्वातंत्र्याचा सामाजिक आणि राजकीय इतिहास येथून सुरु होतो. हजारो लोक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे आज आनंदाचा दिवस आहे.
करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अजय सेंगर यांनी भीमा-कोरेगाव येथे शौर्यदिन नव्हे तर श्रद्धांजली सभा व्हायला पाहिजे, असे म्हटले होते. त्यामुळे १ जानेवारीला साजरा होणाऱ्या कोरेगाव-भीमा येथील शौर्यदिनाच्या कार्यक्रमावर बंदी घाला, असेही त्यांनी म्हटले होते. एवढेच नव्हे तर आम्ही त्याठिकाणी जाऊन श्रद्धांजली सभा घेऊ, असा इशाराही करणी सेनेने दिला होता. इंग्रजांविरोधात लढताना जे शहीद झाले त्या भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी हजारो महाराष्ट्र करणी सैनिक कोरेगाव येथे जाणार आहोत. पोलिसांनी आम्हाला अडवू नये. कोरेगावचा खोटा इतिहास सांगून युवकांची माथी भडकवली जात आहेत, असा आरोप अजय सेंगर यांनी केला होता. या आरोपाला प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले. देश गुलाम का झाला? तर ते चातुर्वण्यामुळे झाले. चातुवर्णीयांमध्ये असलेला क्षत्रिय हा लढाऊ होता. तो हारला की देश हारला, लोक हारले, समाज हारला, असा समज होता. त्यामुळे कोणी काय विधान करावे ते त्याने विचारपूर्वक करावे नाहीतर ते त्यांच्याच अंगलट येते, अशी परिस्थिती आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055