ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून राष्ट्रवादीच्या पदाधिकारीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला
Aurangabad : पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष भाऊसाहेब तरमाळे यांच्यावर विरोधकांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी सात आरोपींविरोधात बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी भाऊसाहेब यांच्या आई चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. या निवडणुकीचा राग विरोधकांच्या मनात होता. शनिवारी रात्री भाऊसाहेब हे गावात आले असता अनिकेत नागे याने त्यांच्यांशी वाद घातला व स्वतः जवळील धारदार चाकूने त्यांच्या मानेवर वार केला आहे. अनिकेत अशोक नागे, राजु बनकर, आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनिल रुपचंद खरात, पांडुरंग भाकचंद नागे (सर्व रा. बोकुड जळगाव, पैठण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
घाव जोरात बसल्याने रक्तस्त्राव झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याच्या पथकाने गावात धाव घेतली. जखमी असलेल्या भाऊसाहेब यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या एका खासगी रुग्णालायत त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी सात आरोपींविरोधात विविध कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055